Sunday, 17 June 2018

तक्र (ताक)

तक्र (ताक)

पथ्यकर ताक:
अ)-चांगले तयार झालेल्या ताज्या दह्यात चार पट स्वचछ पाणी घालून घुसळून घ्यावे.लोणी काढावे.
आ)ह्या पद्धतीने केलेले ताक अतिशय चवदार, पचायला हलके,मल-मुत्र ची प्रवृत्ती साफ करणारा,स्वत: सहज पचणारा  व पचनास मदत करणारा आहे.
इ)ताक द्रवमलप्रवृत्ति,शेंब पडणे,मुळव्याध,पोटात वात धरणे,पोट  दुखणे,पचनाच्या तक्रारी,कृमी,नेत्ररोग, मुतखडा,मुत्रविकार, इत्यादी आजारात  उपयोगी आहे.

ताकात घालावयाच्या औषधी:-
1)वातरोगात ताक सैंधव मीठ घालून प्यावे
2)पित्ताच्या रोगात ताक साखर घालून प्यावे
3)कफाच्या रोगात ताक सुंठ,सैंधव,काळे मिरे, पिंपळी घालूनप्यावे
4) मूत्रकष्टता असेल तर ताक गुळ घालून प्यावे
5)अॅनिमीया ,रकताल्पता असल्यास 
 ताकात चित्रक  चुर्ण मिसळून लोहयुक्त औषधीसह    घ्यावे
6) खाल्ले की लगेच मलप्रवृत्ति होणे(IBS) 
   ह्या आजारात अन्न पूर्णपणे बंद करुन .  पांढरे जिरे भाजून बारीक करुन ताकात घालून तेच 15दिवस प्यावे.नंतर क्रमाने आहार चालू करावा.आहारात रोज जिरेयुक्त ताक चालुच ठेवावे

*टीप:-  ताक रोज नविन बनवावा. शक्यतोवर देशीगायी/शेळी चे दुधापासून बनवलेले असावे.

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...