Tuesday, 10 August 2021

Importance of breast Milk according to the Ayurveda

1)It is very important to get sufficient breast milk to every child. 

2) Breast milk provides Physical and psychological benefits to both mother and baby. 

3)Good Quality of breast Milk- 
अव्याहतबलाङ्गायुररोगो वर्धते सुखम्l
शिशुधात्र्योरनापत्तिः शुद्धक्षीरस्य लक्षणम् ll 
का. सं. सू. 19/26 

Good Quality of breast Milk is that which provides unobstructed, good strength, growth of all body parts,longevity and good health to the child and does not cause any trouble to the child and wet- nurse (धात्री). 

4)Getting proper good quality breast milk to the baby is dependent on nutrition of mother during pregnancy and after delivery. 

5)Formation of Breast Milk (स्तन्य) :- 
रसप्रसादो मधुरः पक्वाहारनिमित्तज:l 
 कृत्स्नदेहात् स्तनौप्राप्तःस्तन्यमित्यभिधीयते ll
सु. सं. नि. 10/18 

After digestion of food the 'Rasa' is formed. Sweet essence part of this Rasa circulating through entire body, reaches breast and it is called as Stanya(स्तन्य) /breast milk. 

 Vd Pratibha Bhave 
 BAMS MD 
 Prasutitantra Streeroga

Thursday, 11 March 2021

शिंका येणे, सर्दी, नाक चोंदणे, डोळ्यात पाणी, डोके दुखणे, खोकला, हातपाय दुखणे, ताप येणे अशी लक्षणे निर्माण झाल्यावर

शिंका येणे, सर्दी, नाक चोंदणे, डोळ्यात पाणी, डोके दुखणे, खोकला, हातपाय दुखणे,ताप येणे अशी लक्षणे निर्माण झाल्यावर Anacin, coldarin अशी औषधी मनाने घेण्यापेक्षा व्योषादी वटी घ्या. वातावरण बदलामुळे,अ‍ॅलर्जी मुळे वरील लक्षणे निर्माण होत असल्यास उपयोग होतो 1)व्योषादी वटी कुठल्याही मेडीकल स्टोअर्स मध्ये मिळते. 2)ह्यात सुंठ, मिरे, पिंपळी, चित्रकमूळ, चव्य इत्यादी आयुर्वेदिक वनस्पती औषधी आहेत 3)भूक लागत नसेल तर भूक वाढवण्यासाठी सुद्धा ह्या वटी चा चांगला उपयोग होतो 4)तोंडाला चव नसेल, नाकातून दुर्गंधी युक्त दुर्गंधी येत असेल, डोके दुखत असेल, घट्ट चिक्कट कफ बाहेर पडत असेल अशावेळी ही वटी घ्यावी 5)ही वटी प्रौढ व बाल दोघांनाही देता येते 6) प्रौढांनी दिवसातून 5ते 6गोळया चघळाव्या किंवा गरम पाण्यात घ्यावे. 7)लहान मुलांना अर्धी गोळी 5ते 6वेळा चघळण्यास द्यावी 8)ही वटी अतिशय चवदार व सुगंधी असल्यामुळे लहान मुले आवडीने घेतात.

गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून

HPV - 16,HPV-18 ह्या नावाच्या व्हायरस ने गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. परंतु जरी त्या स्त्री मध्ये हे व्हायरस सापडले तरी कॅन्सर होईलच असे नाही. त्याच्या जोडीला अनेक कारणे आहेत त्यामुळे त्या अवयवांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली तरच कॅन्सर होतो. - ह्या व्हारसपासून लगेच कॅन्सर होत नाही त्यामुळे कॅन्सर होण्यापासून रोखता येते. -कॅन्सर होण्यासाठी जवळजवळ 20 वर्षांचा कालावधी लागतो. *******गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची कारणे**** -HPV - 16,HPV - 18 हे मुख्य, त्यासोबत -खुप वर्ष गर्भ निरोधक गोळया खाणे -विवाहाच्या वेळी वय कमी असणे -अधिक अपत्य असणे -एकापेक्षा अधिक जोडीदार असणे -धुम्रपान करणे -अपत्यपथात वारंवार जंतूसंसर्ग होणे, मार्गाची अस्वच्छता -रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे. ****************************************** गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे? 1)वरील सर्व कारणे टाळावी. 2)डाॅक्टर /वैद्य कडून PAP smear ही चाचणी करुन घ्यावी. 3)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ऋतु नुसार पंचकर्म, उत्तरबस्ति,अपत्यपथधुपन,धावन हे उपचार करावे . शक्तीवर्धक औषधी घ्याव्या. 4)आहार विधी, दिनचर्या, ऋतुचर्या पालन करावी. 5)शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवावे

Thursday, 10 December 2020

अन्नपदार्थ पचायला हलके किंवा जड कसे ओळखायचे?

सर्व अन्न पदार्थ पचायला हलके किंवा जड कसे असतात ते स्वतःला निरिक्षण करुन ठरवता येतात.   जगातील सर्वच आहार पदार्थाचे वर्गीकरण करता येणे अवघड आहे असे आयुर्वेद सांगतो. च. सू.अध्याय 27

1) अन्नपदार्थ वनस्पती (शाकाहार) जन्य असो वा प्राणिज(मांसाहार), ते कुठे व कसे उत्पन्न झाले ,स्त्रीलिंगी की पुल्लिंगी आहे, ते कशा पद्धतीने शिजवले आहे ह्यावर पदार्थांचा जडपणा व हलकेपणा अवलंबून आहे. अधिक पाण्यात निर्माण होणारे पदार्थ पचायला जड असतात. 
जसे
2) सफरचंद पेक्षा केळी पचायला जड आहेत. शिंगडा जड आहे. राजगिरा हलका. 
3) नविन तांदुळाचा भात पचायला जड असतो, त्याच्या लाह्या हलक्या असतात. कुकरमध्ये केलेला भात जड व मोकळ्या भांड्यात झाकण न ठेवता शिजवलेला भात हलका असतो
4) काही अन्न पदार्थ स्वभावतःच जड असतात. जसे मूगापेक्षा, हरभरा व त्यापेक्षा उडीद, राजमा जड असतो
5) मांसाहार करणाऱ्यांना असे ठरवता येईल. 
बकऱ्यापेक्षा बकरीचे मास हलके बांधून ठेवलेल्या बकऱ्यापेक्षा चरणाऱ्या मोकळ्या बकऱ्याचे मांस हलके. कोंबडीच्या बाबतीत हेच लागू होते

टीप:
पचायला जड पदार्थ कमी प्रमाणात घेतली तर पचायला हलके जातात, तर हलकी पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यावर जड ठरतात. म्हणून भोजन यज्ञकर्म आहे हे लक्षात घ्या व निरोगी राहण्यासाठी भरपूर प्रयत्न करा. 

Tuesday, 1 December 2020

केसांच्या व डोक्याच्या तक्रारींसाठी

 डोक्याला  तेल लावण्याचे प्रकार 

1)शिरो- अभ्यंग
2)शिरो- परिषेक
3)शिरो- पिचू
4)शिरो-बस्ति 

************************
1)शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला औषधीयुक्त तेलाने हळूहळू मालिश करणे. 
साधारणपणे डोकयातील त्वचा कोरडी पडली असेल, खाज येत असेल, मलिन झाली असेल तर केल्या जाते
2)परिषेक म्हणजे औषधीयुक्त तैल डोक्यावर शिंपडणे. 
डोक्यात फोडे, जखमा, होणे. डोके दुखणे आग होणे अशा तक्रारींसाठी ह्याचा उपयोग होतो
3)शिरोपिचू- ह्यात डोक्याच्या पुढच्या भागी(Anterior fontanel) औषधीतेलयुक्त कापसाचा/कापडी तुकडा ठेवतात. केस गळणे, डोक्याच्या त्वचेवर चिरा पडणे, धूपनाच्यावेळी, नेत्रस्तंभ(eyelid dysfunction) अशा आजारात करतात 
4)शिरो-बस्ति - 
यंत्राच्या साहाय्याने अर्धा ते एक लिटर औषधीयुक्त तेल डोक्यावर ठेवले जाते. 
डोके बधिर होणे, अर्दित (bell's palsy), रात्री जागरण करणे, नाक व मुख,तोंड कोरडे पडणे, तिमिर cataract, साध्या उपायांनी बरे न होणारे डोक्याचे आजार ह्यात उपयोग होतो. 

************************

नियमितपणे केसांना तेल लावल्यास होणारे फायदे 
1)केस गळत नाही, पांढरे किंवा भुरे होत नाही.
2) डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही. 
3)वाता मुळे होणारे रोग नष्ट होतात
4)ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रियांची कार्य शक्ती वाढते
5)आवाज, स्वर चांगला होतो
6)हनुवटी(lower jaw) व शिर ह्यांची कार्यशक्ती वाढते

संदर्भ - अ. हृ. सू. 23

पाळी वेळेत येत नाही? बीज नीट तयार होत नाही?

 सोनोग्राफी मध्ये PCOD असा रिपोर्ट आहे का? डॉक्टरांनी PCOS आहे असे सांगितले का? 

कुठल्या प्रकारचा PCOS आहे ते जाणून घ्या व आयुर्वेदिक उपचार घ्या 

***************************************** 


PCOS चे प्रकार 

1)Insulin-Resistant Type of PCOS

ह्यात रक्तातील साखर संतुलित राखणे महत्त्वाचे असते 


2)Inflammatory Type of PCOS

hs CRP ही टेस्ट केल्यावर positive येते. त्यानुसार आहार व औषधी दिल्या जातात 


3)Post pill Type PCOS

ह्या प्रकारात हार्मोन्स च्याऔषधांचा परीणाम होऊन पाळीच्या तक्रारी निर्माण होतात 


4) Adrenal Type of PCOS

ह्यात महत्त्वाचे म्हणजे prolactin सुद्धा वाढलेले असते. 


5) Hidden Cause Type of PCOS

ह्यात Hypothyroidism असणे,तसेच zinc, vitD, iodone ची कमतरता. Prolactin वाढलेले असणे. कारण शोधून त्यानुसार उपचार केले जातात. 


6)Lean Type of PCOS

ह्या प्रकारात स्त्रियांची शरीरयष्टी बारीक असते.

Friday, 24 July 2020

बला/चिकणा (Sida cardifolia)

  • It is available all over in India. 
  • It improves quality and quantity of sperm. 
  • Useful in male and female infertility due to quality of eggs 
  • It is Vrishya and Rasayan. 
  • Useful in paralysis, parkinsonism and other Vata disorders 
  • Also useful in preeclampsia to control hypertension and oedema and it is useful to gain wt of fetus.

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...