Tuesday, 1 December 2020

केसांच्या व डोक्याच्या तक्रारींसाठी

 डोक्याला  तेल लावण्याचे प्रकार 

1)शिरो- अभ्यंग
2)शिरो- परिषेक
3)शिरो- पिचू
4)शिरो-बस्ति 

************************
1)शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला औषधीयुक्त तेलाने हळूहळू मालिश करणे. 
साधारणपणे डोकयातील त्वचा कोरडी पडली असेल, खाज येत असेल, मलिन झाली असेल तर केल्या जाते
2)परिषेक म्हणजे औषधीयुक्त तैल डोक्यावर शिंपडणे. 
डोक्यात फोडे, जखमा, होणे. डोके दुखणे आग होणे अशा तक्रारींसाठी ह्याचा उपयोग होतो
3)शिरोपिचू- ह्यात डोक्याच्या पुढच्या भागी(Anterior fontanel) औषधीतेलयुक्त कापसाचा/कापडी तुकडा ठेवतात. केस गळणे, डोक्याच्या त्वचेवर चिरा पडणे, धूपनाच्यावेळी, नेत्रस्तंभ(eyelid dysfunction) अशा आजारात करतात 
4)शिरो-बस्ति - 
यंत्राच्या साहाय्याने अर्धा ते एक लिटर औषधीयुक्त तेल डोक्यावर ठेवले जाते. 
डोके बधिर होणे, अर्दित (bell's palsy), रात्री जागरण करणे, नाक व मुख,तोंड कोरडे पडणे, तिमिर cataract, साध्या उपायांनी बरे न होणारे डोक्याचे आजार ह्यात उपयोग होतो. 

************************

नियमितपणे केसांना तेल लावल्यास होणारे फायदे 
1)केस गळत नाही, पांढरे किंवा भुरे होत नाही.
2) डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही. 
3)वाता मुळे होणारे रोग नष्ट होतात
4)ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रियांची कार्य शक्ती वाढते
5)आवाज, स्वर चांगला होतो
6)हनुवटी(lower jaw) व शिर ह्यांची कार्यशक्ती वाढते

संदर्भ - अ. हृ. सू. 23

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...