Thursday, 11 March 2021

गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून

HPV - 16,HPV-18 ह्या नावाच्या व्हायरस ने गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. परंतु जरी त्या स्त्री मध्ये हे व्हायरस सापडले तरी कॅन्सर होईलच असे नाही. त्याच्या जोडीला अनेक कारणे आहेत त्यामुळे त्या अवयवांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली तरच कॅन्सर होतो. - ह्या व्हारसपासून लगेच कॅन्सर होत नाही त्यामुळे कॅन्सर होण्यापासून रोखता येते. -कॅन्सर होण्यासाठी जवळजवळ 20 वर्षांचा कालावधी लागतो. *******गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची कारणे**** -HPV - 16,HPV - 18 हे मुख्य, त्यासोबत -खुप वर्ष गर्भ निरोधक गोळया खाणे -विवाहाच्या वेळी वय कमी असणे -अधिक अपत्य असणे -एकापेक्षा अधिक जोडीदार असणे -धुम्रपान करणे -अपत्यपथात वारंवार जंतूसंसर्ग होणे, मार्गाची अस्वच्छता -रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे. ****************************************** गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे? 1)वरील सर्व कारणे टाळावी. 2)डाॅक्टर /वैद्य कडून PAP smear ही चाचणी करुन घ्यावी. 3)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ऋतु नुसार पंचकर्म, उत्तरबस्ति,अपत्यपथधुपन,धावन हे उपचार करावे . शक्तीवर्धक औषधी घ्याव्या. 4)आहार विधी, दिनचर्या, ऋतुचर्या पालन करावी. 5)शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवावे

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...