सर्व अन्न पदार्थ पचायला हलके किंवा जड कसे असतात ते स्वतःला निरिक्षण करुन ठरवता येतात. जगातील सर्वच आहार पदार्थाचे वर्गीकरण करता येणे अवघड आहे असे आयुर्वेद सांगतो. च. सू.अध्याय 27
1) अन्नपदार्थ वनस्पती (शाकाहार) जन्य असो वा प्राणिज(मांसाहार), ते कुठे व कसे उत्पन्न झाले ,स्त्रीलिंगी की पुल्लिंगी आहे, ते कशा पद्धतीने शिजवले आहे ह्यावर पदार्थांचा जडपणा व हलकेपणा अवलंबून आहे. अधिक पाण्यात निर्माण होणारे पदार्थ पचायला जड असतात.
जसे
2) सफरचंद पेक्षा केळी पचायला जड आहेत. शिंगडा जड आहे. राजगिरा हलका.
3) नविन तांदुळाचा भात पचायला जड असतो, त्याच्या लाह्या हलक्या असतात. कुकरमध्ये केलेला भात जड व मोकळ्या भांड्यात झाकण न ठेवता शिजवलेला भात हलका असतो
4) काही अन्न पदार्थ स्वभावतःच जड असतात. जसे मूगापेक्षा, हरभरा व त्यापेक्षा उडीद, राजमा जड असतो
5) मांसाहार करणाऱ्यांना असे ठरवता येईल.
बकऱ्यापेक्षा बकरीचे मास हलके बांधून ठेवलेल्या बकऱ्यापेक्षा चरणाऱ्या मोकळ्या बकऱ्याचे मांस हलके. कोंबडीच्या बाबतीत हेच लागू होते
टीप:
पचायला जड पदार्थ कमी प्रमाणात घेतली तर पचायला हलके जातात, तर हलकी पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यावर जड ठरतात. म्हणून भोजन यज्ञकर्म आहे हे लक्षात घ्या व निरोगी राहण्यासाठी भरपूर प्रयत्न करा.
No comments:
Post a Comment