Wednesday, 19 February 2025

नैसर्गिक मेहंदी उन्हाळयात हमखास लावावी

 ***************

आरोग्यासाठी उन्हाळ्यात हमखास मेहंदी च्या हिरव्या पानांचा किंवा सुकलेल्या पानाच्या चुर्णाचा उपयोग करावा 

***************

  • ह्याची पाने गुणाने थंड असल्यामुळे पित्ता चा उष्ण गुण कमी करतात 
  • डोके दुखत असेल तर टाळूला मेहंदी चा लेप करावा
  • हाता पायांची आग होत असेल तर हाताला तळपायाला शुध्द मेहंदी लावावी.
  • सांधे सूज असेल तर ह्याच्या लेपाने बरे वाटते
  • त्वचेचे आजारात मेहंदी चा लेप करतात
  • आयुर्वेदात मेहेंदी ला #केश्य म्हटले आहे.
  • केश्य म्हणजे केसांचा पोत सुधारणारे, केश वाढवणारे.
  • मेहेंदी केसांसाठी नेहमी वापरल्यास केसांचे स्वास्थ्य सुधारते.
  • मुत्रप्रवृत्ती ला जळजळ होत असेल तर मेहंदीच्या पानांचा 5-10ml रस खडीसाखर मिसळून दिल्यास जळजळ कमी होते

*************

पूर्वी ही नैसर्गिक मिळणारी मेहंदी निरनिराळया सणांमध्ये लग्नांमध्ये लावली जात असे. त्यासाठी मेहेंदी ची ओली पाने किंवा पानांची पावडर वापरले जात असे. त्यामुळे आपोआपच आरोग्य सुद्धा जपले जात होते.

आता #केमिकल्स वापरल्या जातात. त्यांचे वाईट परीणाम होतात. तरीसुद्धा पार्लर मध्ये आवर्जून सांगतात की केसांना मेहंदी वापरू नका. Coating होते,त्यामुळं केश खराब होतात.

परंतु आयुर्वेद मते मेहंदी नेहमीच केसांसाठी व त्वचा यासाठी उत्तम आहे.

उन्हाळ्यात आरोग्यासाठी हमखास नैसर्गिक मेहंदी लावावी.

************

Vd Pratibha Bhave 

8766740253

Friday, 7 February 2025

Piles? Why do you suffer?

It is necessary to understand the causative factors of piles. These all factors causes inflammation of rectal mucosa, it's folding.

************

Causative factors are:-

1) Accumulation of faces due to weak digestion power (agni)

2) Too much copulation 

3) Too much Riding on vehicles 

4) Seating for long time on uneven surfaces, hard seat,

5) Seating on own heals (उत्कटासन)

6) Injury caused by instruments, stones, bricks, cloths, etc.

7) Contact with very cold water

8) Excessive straining during defecation 

9) Habit to suppress natural urges of flatus, urine and feces or premature initiation of it.

10) Retention of Ama (undigested material) in the digestive system 

11) Fever, tumours, diarrheas', diseased duodenum, dropsy ,anemia 

12) In the woman due to exertion, emaciation ,#abortion, pressure caused by developing #fetus

*************

*Due to these and other similar causes,

 initiate vitiation of Apan vayu. 

*Apan vayu gets aggravated and withhold accumulated feces in the folds of the rectum(पायोर्वली)

*Due to these, folds of rectum gets inflamed (तास्वभिष्यण्ण)and piles occurs 

****************

Ref ashtanga hrudaya Arshonidan (अर्शोनिदान) 7/10-14

************

Vd Pratibha Bhave 

8766740253

तांदुळाचे धुवण / तंडुलोदकम् (Rice Water)

  • कांडलेले तांदुळ घ्यावे , त्यात तांदुळाच्या आठपट पाणी घालावे.
  • त्या आठपट पाण्यात तांदुळ चागले धुवावेत.
  • ते पांढरे रंगाचे पाणी तयार होते त्याला तंडुलोदक म्हणतात.

  1. आजाराच्या मुख्य औषधासोबत तंडुलोदक फार उपयोगी आहे.
  2. वारंवार तहान लागत असेल तर प्यावे
  3. उलटी होणे, शेम पडणे, अतिसार (#loose motions) 
  4. कष्टाने मुत्रप्रवृत्ती (#dysuria)
  5. ह्यासाठी उत्तम आहे.
  6. त्यामुळे उलटी, अतिसारा, मुत्रविषयी च्या औषधांसोबत हे दिले तर चांगला गुण येतो.


तंडुलोदक हे थंड गुणाचे आहे , त्यामुळे शरीरातील दाह कमी होतो. तसेच व्रणावर आवरण तयार करतो त्यामुळे दाह कमी करण्यास मदत होते.

(#coating ulcers) 

*************

संदर्भ - वैद्य गो. आ. फडके 

द्रव्य गुण शास्त्रम् पां. नं.127

**************

जसे —----

  • स्त्रियांमध्ये अंगावर अधिक प्रमाण, अनियमीत रक्तस्त्राव/श्र्वेतस्त्राव होत असेल तर  पुष्यानुग चुर्ण तांदुळाचे धुवण मधून देतात 
  • अतिसार मध्ये संजीवनी वटी तांदुळाचे धुवण मधून देतात . 
  • व्रण उपलेप (coating ulcers )हा गुण असल्यामुळे #stomach ulcers, #IBS, उपयोगी आहे 

************”**

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist, Pune 

8766740253

गर्भाशयाचे आतले पातळ अस्तर सुधारण्यासाठी (Ayurvedic treatment for thin Endometrium)

 गर्भ न राहणे किंवा गर्भपात होण्याच्या अनेक कारणांपैकी गर्भाशयाचे आतले अस्तर पातळ असणे हे एक महत्त्वाचे कारण आहे

गर्भाशयाचे सर्वात आतले अस्तर (#Endometrium) ची जाडी 7 mm पेक्षा पुढे वाढत नसेल तर त्याला  #Thin endometrium म्हणतात.

************

पुढील मुख्य कारणांनी endometrium thin होते.

*हॉर्मोन्स असंतुलित असणे

* मेनोपॉझ 

* PCOS

* गर्भाशयात वारंवार इन्फेक्शन होणे

*गर्भपात करतांना गर्भाशयाला इजा होणे

 (D and C )

*Tuberculosis 

*Autoimmune disease जसे- RA,Lupus, आतड्यांचे आजार.

* गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला योग्य प्रकारे रक्त पुरवठा न होणे.

* शरीरात पोषक तत्वांची कमतरता.

* हॉर्मोन्स च्या गोळ्या घेणे

**********

गर्भाशयाचे आतले अस्तर(endometrium) पातळ झाले तर पाळीच्या वेळी रक्तस्त्राव  कमी प्रमाणात होतो, कमी दिवस होतो व पाळी उशिरा,अनियमीत येते.

************

गर्भाशयाचे आतले अस्तर(endometrium) ची जाडी 7mm पेक्षा कमी असले तर गर्भ गर्भाशयात रुजणे कठीण असते. 

IUI,Test tube baby,IVF सुद्धा यशस्वी होत नाही .जर गर्भ रुजले तर गर्भपात होतो किंवा पुर्ण दिवस न भरता प्रसूति होते.

म्हणून सदृढ गर्भधारणेसाठी गर्भाशयाचे आतले अस्तर 7mm ते 11mm असणे आवश्यक आहे.

************

गर्भाशयाचे आतले अस्तर योग्य होण्यासाठी:-

*आयुर्वेदिक उपचार पद्धती ने पंचकर्म, उत्तरबस्ति केल्याने शरीरात पोषक तत्वे उत्तम प्रकारे शोषली जातात. 

*आतड्यांचे आजार बरे होतात.शरीरात साठलेली विषारी पदार्थ बाहेर पडतात.

*रोगप्रतिकार शक्ती वाढते.

*#उत्तरबस्ती व बस्तीमुळे गर्भाशयाकडील रक्तप्रवाह सुधारतो. त गर्भाशयातील आतले अस्तर योग्य प्रमाणात वाढते. 

*त्यामुळे नैसर्गिकपणे गर्भधारणा होते. गर्भ टिकतो .

सुदृढ बाळ जन्माला येते असा आमचा अनुभव आहे.

***********

Vd Pratibha Bhave 

BAMS, MD Ayu Obstetrics and Gynaecology 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

गर्भाची प्राकृतपणे वाढ होण्यासाठी

गर्भिणी अवस्थेत स्त्री ज्याप्रकारच्या आहार-विहार घेते, जन्माला येणाऱ्या बाळाला तोच पचतो व आवडतो म्हणून पुढे दिलेल्या नियमानुसार वागावे.

  1. नित्य पथ्यकर आहार -विहार घ्यावा.
  2. अपथ्यकर आहार विहार सोडून द्यावा.
  3. गर्भिणी अवस्थेत मन नेहमी प्रसन्न ठेवावे.मनाला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून अलिप्त राहावे.
  4. ह्या अवस्थेत प्रथम दिवसांपासूनच श्वेत ,स्वच्छ वस्त्र धारण करावे.
  5. स्वत: गर्भिणी ने हवन,शान्तिकर्म,पुजा पाठ करावे.
  6. बसण्याची,झोपण्याची जागा मृदु,नरम, आधारयुक्त व बाधारहित-जंतू-अपघात रहित असावी.
  7. बसण्याची, झोपण्याची जागा फार उंचावर नसावी.
  8. मनाला प्रसन्न करणाऱ्या आहाराचे परंतु पथ्यकर असा आहार घ्यावा.
  9. द्रवयुकत,गोड,दूध,तूप, श्रीखंड,मांस रस(सूप) ,लोणी  व भूक वाढवणाऱ्या पदार्थांने युक्त पदार्थांचा आहारात वापर करावा.
  10. हयाशिवाय प्रांतानुसार, ऋतुनुसार,पाचनशक्तिचा विचार करुन आहार घ्यावा.
  11. पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.
  12. मुग,गहू,साळीचा भात-लाह्या,केळी,आवळा,द्राक्षा,ह्याचा  नेहमी समावेश असावा.
  13. फलघृत नावाचे औषध रोज घ्यावे.
  14. अंगाला लाक्षादी तेल लावावे.
  15. गर्भिणीला स्नानासाठी बेलगिरी,कार्पास,गुलाब,पिचुमंद,अग्निमंथ, जटामांसी,व एरण्डपत्र ह्यांच्या काढयाचा वापर करावा.

*********

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...