Friday, 7 February 2025

गर्भाशयाचे आतले पातळ अस्तर सुधारण्यासाठी (Ayurvedic treatment for thin Endometrium)

 गर्भ न राहणे किंवा गर्भपात होण्याच्या अनेक कारणांपैकी गर्भाशयाचे आतले अस्तर पातळ असणे हे एक महत्त्वाचे कारण आहे

गर्भाशयाचे सर्वात आतले अस्तर (#Endometrium) ची जाडी 7 mm पेक्षा पुढे वाढत नसेल तर त्याला  #Thin endometrium म्हणतात.

************

पुढील मुख्य कारणांनी endometrium thin होते.

*हॉर्मोन्स असंतुलित असणे

* मेनोपॉझ 

* PCOS

* गर्भाशयात वारंवार इन्फेक्शन होणे

*गर्भपात करतांना गर्भाशयाला इजा होणे

 (D and C )

*Tuberculosis 

*Autoimmune disease जसे- RA,Lupus, आतड्यांचे आजार.

* गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला योग्य प्रकारे रक्त पुरवठा न होणे.

* शरीरात पोषक तत्वांची कमतरता.

* हॉर्मोन्स च्या गोळ्या घेणे

**********

गर्भाशयाचे आतले अस्तर(endometrium) पातळ झाले तर पाळीच्या वेळी रक्तस्त्राव  कमी प्रमाणात होतो, कमी दिवस होतो व पाळी उशिरा,अनियमीत येते.

************

गर्भाशयाचे आतले अस्तर(endometrium) ची जाडी 7mm पेक्षा कमी असले तर गर्भ गर्भाशयात रुजणे कठीण असते. 

IUI,Test tube baby,IVF सुद्धा यशस्वी होत नाही .जर गर्भ रुजले तर गर्भपात होतो किंवा पुर्ण दिवस न भरता प्रसूति होते.

म्हणून सदृढ गर्भधारणेसाठी गर्भाशयाचे आतले अस्तर 7mm ते 11mm असणे आवश्यक आहे.

************

गर्भाशयाचे आतले अस्तर योग्य होण्यासाठी:-

*आयुर्वेदिक उपचार पद्धती ने पंचकर्म, उत्तरबस्ति केल्याने शरीरात पोषक तत्वे उत्तम प्रकारे शोषली जातात. 

*आतड्यांचे आजार बरे होतात.शरीरात साठलेली विषारी पदार्थ बाहेर पडतात.

*रोगप्रतिकार शक्ती वाढते.

*#उत्तरबस्ती व बस्तीमुळे गर्भाशयाकडील रक्तप्रवाह सुधारतो. त गर्भाशयातील आतले अस्तर योग्य प्रमाणात वाढते. 

*त्यामुळे नैसर्गिकपणे गर्भधारणा होते. गर्भ टिकतो .

सुदृढ बाळ जन्माला येते असा आमचा अनुभव आहे.

***********

Vd Pratibha Bhave 

BAMS, MD Ayu Obstetrics and Gynaecology 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...