गर्भिणी अवस्थेत स्त्री ज्याप्रकारच्या आहार-विहार घेते, जन्माला येणाऱ्या बाळाला तोच पचतो व आवडतो म्हणून पुढे दिलेल्या नियमानुसार वागावे.
- नित्य पथ्यकर आहार -विहार घ्यावा.
- अपथ्यकर आहार विहार सोडून द्यावा.
- गर्भिणी अवस्थेत मन नेहमी प्रसन्न ठेवावे.मनाला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून अलिप्त राहावे.
- ह्या अवस्थेत प्रथम दिवसांपासूनच श्वेत ,स्वच्छ वस्त्र धारण करावे.
- स्वत: गर्भिणी ने हवन,शान्तिकर्म,पुजा पाठ करावे.
- बसण्याची,झोपण्याची जागा मृदु,नरम, आधारयुक्त व बाधारहित-जंतू-अपघात रहित असावी.
- बसण्याची, झोपण्याची जागा फार उंचावर नसावी.
- मनाला प्रसन्न करणाऱ्या आहाराचे परंतु पथ्यकर असा आहार घ्यावा.
- द्रवयुकत,गोड,दूध,तूप, श्रीखंड,मांस रस(सूप) ,लोणी व भूक वाढवणाऱ्या पदार्थांने युक्त पदार्थांचा आहारात वापर करावा.
- हयाशिवाय प्रांतानुसार, ऋतुनुसार,पाचनशक्तिचा विचार करुन आहार घ्यावा.
- पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.
- मुग,गहू,साळीचा भात-लाह्या,केळी,आवळा,द्राक्षा,ह्याचा नेहमी समावेश असावा.
- फलघृत नावाचे औषध रोज घ्यावे.
- अंगाला लाक्षादी तेल लावावे.
- गर्भिणीला स्नानासाठी बेलगिरी,कार्पास,गुलाब,पिचुमंद,अग्निमंथ, जटामांसी,व एरण्डपत्र ह्यांच्या काढयाचा वापर करावा.
*********
Vd Pratibha Bhave
Ayurvedic Gynaecologist Pune
No comments:
Post a Comment