- कांडलेले तांदुळ घ्यावे , त्यात तांदुळाच्या आठपट पाणी घालावे.
- त्या आठपट पाण्यात तांदुळ चागले धुवावेत.
- ते पांढरे रंगाचे पाणी तयार होते त्याला तंडुलोदक म्हणतात.
- आजाराच्या मुख्य औषधासोबत तंडुलोदक फार उपयोगी आहे.
- वारंवार तहान लागत असेल तर प्यावे
- उलटी होणे, शेम पडणे, अतिसार (#loose motions)
- कष्टाने मुत्रप्रवृत्ती (#dysuria)
- ह्यासाठी उत्तम आहे.
- त्यामुळे उलटी, अतिसारा, मुत्रविषयी च्या औषधांसोबत हे दिले तर चांगला गुण येतो.
तंडुलोदक हे थंड गुणाचे आहे , त्यामुळे शरीरातील दाह कमी होतो. तसेच व्रणावर आवरण तयार करतो त्यामुळे दाह कमी करण्यास मदत होते.
(#coating ulcers)
*************
संदर्भ - वैद्य गो. आ. फडके
द्रव्य गुण शास्त्रम् पां. नं.127
**************
जसे —----
- स्त्रियांमध्ये अंगावर अधिक प्रमाण, अनियमीत रक्तस्त्राव/श्र्वेतस्त्राव होत असेल तर पुष्यानुग चुर्ण तांदुळाचे धुवण मधून देतात
- अतिसार मध्ये संजीवनी वटी तांदुळाचे धुवण मधून देतात .
- व्रण उपलेप (coating ulcers )हा गुण असल्यामुळे #stomach ulcers, #IBS, उपयोगी आहे
************”**
Vd Pratibha Bhave
Ayurvedic Gynaecologist, Pune
8766740253
No comments:
Post a Comment