***************
आरोग्यासाठी उन्हाळ्यात हमखास मेहंदी च्या हिरव्या पानांचा किंवा सुकलेल्या पानाच्या चुर्णाचा उपयोग करावा
***************
- ह्याची पाने गुणाने थंड असल्यामुळे पित्ता चा उष्ण गुण कमी करतात
- डोके दुखत असेल तर टाळूला मेहंदी चा लेप करावा
- हाता पायांची आग होत असेल तर हाताला तळपायाला शुध्द मेहंदी लावावी.
- सांधे सूज असेल तर ह्याच्या लेपाने बरे वाटते
- त्वचेचे आजारात मेहंदी चा लेप करतात
- आयुर्वेदात मेहेंदी ला #केश्य म्हटले आहे.
- केश्य म्हणजे केसांचा पोत सुधारणारे, केश वाढवणारे.
- मेहेंदी केसांसाठी नेहमी वापरल्यास केसांचे स्वास्थ्य सुधारते.
- मुत्रप्रवृत्ती ला जळजळ होत असेल तर मेहंदीच्या पानांचा 5-10ml रस खडीसाखर मिसळून दिल्यास जळजळ कमी होते
*************
पूर्वी ही नैसर्गिक मिळणारी मेहंदी निरनिराळया सणांमध्ये लग्नांमध्ये लावली जात असे. त्यासाठी मेहेंदी ची ओली पाने किंवा पानांची पावडर वापरले जात असे. त्यामुळे आपोआपच आरोग्य सुद्धा जपले जात होते.
आता #केमिकल्स वापरल्या जातात. त्यांचे वाईट परीणाम होतात. तरीसुद्धा पार्लर मध्ये आवर्जून सांगतात की केसांना मेहंदी वापरू नका. Coating होते,त्यामुळं केश खराब होतात.
परंतु आयुर्वेद मते मेहंदी नेहमीच केसांसाठी व त्वचा यासाठी उत्तम आहे.
उन्हाळ्यात आरोग्यासाठी हमखास नैसर्गिक मेहंदी लावावी.
************
Vd Pratibha Bhave
8766740253
No comments:
Post a Comment