Tuesday, 21 March 2023

हृदयासाठी (For Heart)

'हृदय'आजारी  होऊ नये ह्यासाठी आयुर्वेदाने आतिशय संक्षिप्तपणे उपाय सांगितले आहेत. 

काळ बदलला तरी ते जशीच्या तशी लागू होतात.


1) मानसिक दु:खापासून स्वतः चे रक्षण करावे

2) हृदयाला बल देणारे ,ओजोवर्धक असे औषध, आहार  व दिनचर्या असावी.

3) शरीरातील सर्व मार्ग स्वच्छ करणारा आहार, औषध व दिनचर्या असावी.

4)शांती व ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशिल असावे.


संदर्भ-.... परिहार्या विशेषण मनसो दुःख हेतव: l l

हृदयम् ……..ll चरक सुत्रस्थान 30/13-14

हृदयाची गती थांबली की आयुष्य थांबते म्हणून हृदयाचे रक्षण करण्यासाठी  प्रयत्नशील असावे. 


Vd Pratibha Bhave

BAMS,MD,Ayu

Obstetrics and Gynaecology

8766740253

Ovaries मध्ये तयार होणाऱ्या ग्रंथी (Cysts)

 Ovaries मध्ये तयार होणाऱ्या ग्रंथी (Cysts)

—----------------------------------------------

गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला एक एक डिंबग्रंथी (Ovary) असते.

  • वयाच्या 12 ते15व्या वर्षापासून  ह्या ovaries मधून -दर महिन्याला साधारणपणे 1 बीज तयार होत  असते व ते बीज बिजकोषातून गर्भधारणेसाठी बाहेर पडते. -बीज बाहेर पडल्यावर बिजकोष संकुचित होते .
  • बीज तयार झाल्यावर  कधी कधी ते बाहेर न पडता बीजकोषात पडून राहते व मोठी द्रवपदार्थ भरलेली ग्रंथी तयार होते(follicular cysts)
  • किंवा कधीकधी बीज बाहेर पडल्यावर  बीजकोष संकुचित होत नाही व ते द्रव स्त्रावा ने भरते.(Corpus luteum cyst)
  • ह्या सर्व प्रकारच्या ग्रंथी आकाराने कमी जास्त होत राहतात, जातात. ह्यांना Functional cyst असे म्हणतात 
  • मात्र कधी कधी बीजाची वाढ खुंटते व छोट्या छोट्या अनेक ग्रंथी तयार होतात.ह्याला PCOD म्हणतात अशावेळी उपचाराची गरज असते.
  • याशिवाय अश्याही काही ग्रंथी तयार होतात ज्या आपोआप जात नाही . मोठ्या झाल्या तर त्रास होतो.त्या औषधाने जात नाही . सर्जरी ने काढावे लागते.. त्यांना non-functional cyst म्हणतात .


*************

Vd Pratibha Bhave,

सारस्वतारिष्ट (सुवर्ण युक्त)

 "#सारस्वतारिष्ट (#सुवर्ण युक्त)"

  हे औषध परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावे

***********

  • हया औषधाने परीक्षेच्या काळात अभ्यास, जागरण ह्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण दूर होतो. 
  • हृदय,मनावर येणारे दडपण जाऊन हलकेपणा येतो. *पचनाच्या तक्रारी , डोके दुखणे,पित्त वाढते हया तक्रारी बऱ्या होतात. 
  • विचारांचा गोंधळ उडणे, विसरायला होणे, एकाग्रता नसणे, चक्कर आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे असतील तर ह्या औषधाने लगेच कमी होतात. 
  • हया औषधाने मनाला प्रसन्नता व बुद्धीला तरतरितपणा येतो. स्मरणशक्ती सुधारते. 
  • लहान मुलांना दूधातून नियमीतपणे काही दिवस दिल्यास उच्चार स्पष्टता,उत्तम नेत्रशक्ती, तीव्र बुद्धी व #स्मरणशक्ती निर्माण होते 

**************

Vd Pratibha Bhave Sukhkarta Ayurvedic Panchkarma clinic,Pune 8766740253

चणा/चणक/हरभरा

  • होलिकेका नैवद्यासाठी पुरणाची पोळी करण्याची प्रथा आहे
  • पुरणाची पोळी करण्यासाठी चण्याची डाळ ( हरभरा डाळ) वापरली जाते.
  • आयुर्वेद मते चणक थंड गुणाची आहे.
  • तसेच शरिरातील पित्त व कफ कमी करते
  • रक्तातील उष्णता कमी करते
  • पचायला हलकी असली तरी अधोवायु मल प्रवृत्तीला अवरोध करते. त्यामुळे हरभरा डाळीचे पदार्थ खाल्ल्यावर पोटात वायू होतो . शौचास साफ होत नाही.
  • हे टाळण्यासाठी डाळीचे पदार्थ भरपूर तुपात बनवावे 
  • पुरणपोळी  भरपूर तुप घालून खाल्ली तर पोट फुगणे,पोट दुखणे ह्या तक्रारी होत नाही.   
  • डाळ शरीरातील मेद कमी करणारे आहे  (fat, cholesterol) .
  • उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी गुळ फुटाणे,तूप लावून पुरणपोळ्या, डाळीचे सूप, कढण घेणे हे आरोग्य टिकवायला मदत करणारे आहे.
  • मग आज आरोग्यासाठी पुरणपोळी खायलाच हवी.
  • डायबेटिस असणाऱ्या रुग्णांनी गोड न घालता पुरण पोळी  साजूक तुपात सोबत खावी.

**तेलात तळलेले बेसनाचे भजी करण्यापेक्षा डाळ भिजत घालून वाटून कढीपत्ता,खोबरे,कोथिंबीर , किंचित जिरे ओवा,मिरे,मीठ ,हळद, छोटे छोटे वडे तुपात तळून खावे .ह्याने पित्त होत .नाही. **************

Vd Pratibha Bhave,Pune

8766740253

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...