Tuesday, 21 March 2023

चणा/चणक/हरभरा

  • होलिकेका नैवद्यासाठी पुरणाची पोळी करण्याची प्रथा आहे
  • पुरणाची पोळी करण्यासाठी चण्याची डाळ ( हरभरा डाळ) वापरली जाते.
  • आयुर्वेद मते चणक थंड गुणाची आहे.
  • तसेच शरिरातील पित्त व कफ कमी करते
  • रक्तातील उष्णता कमी करते
  • पचायला हलकी असली तरी अधोवायु मल प्रवृत्तीला अवरोध करते. त्यामुळे हरभरा डाळीचे पदार्थ खाल्ल्यावर पोटात वायू होतो . शौचास साफ होत नाही.
  • हे टाळण्यासाठी डाळीचे पदार्थ भरपूर तुपात बनवावे 
  • पुरणपोळी  भरपूर तुप घालून खाल्ली तर पोट फुगणे,पोट दुखणे ह्या तक्रारी होत नाही.   
  • डाळ शरीरातील मेद कमी करणारे आहे  (fat, cholesterol) .
  • उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी गुळ फुटाणे,तूप लावून पुरणपोळ्या, डाळीचे सूप, कढण घेणे हे आरोग्य टिकवायला मदत करणारे आहे.
  • मग आज आरोग्यासाठी पुरणपोळी खायलाच हवी.
  • डायबेटिस असणाऱ्या रुग्णांनी गोड न घालता पुरण पोळी  साजूक तुपात सोबत खावी.

**तेलात तळलेले बेसनाचे भजी करण्यापेक्षा डाळ भिजत घालून वाटून कढीपत्ता,खोबरे,कोथिंबीर , किंचित जिरे ओवा,मिरे,मीठ ,हळद, छोटे छोटे वडे तुपात तळून खावे .ह्याने पित्त होत .नाही. **************

Vd Pratibha Bhave,Pune

8766740253

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...