Ovaries मध्ये तयार होणाऱ्या ग्रंथी (Cysts)
—----------------------------------------------
गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला एक एक डिंबग्रंथी (Ovary) असते.
- वयाच्या 12 ते15व्या वर्षापासून ह्या ovaries मधून -दर महिन्याला साधारणपणे 1 बीज तयार होत असते व ते बीज बिजकोषातून गर्भधारणेसाठी बाहेर पडते. -बीज बाहेर पडल्यावर बिजकोष संकुचित होते .
- बीज तयार झाल्यावर कधी कधी ते बाहेर न पडता बीजकोषात पडून राहते व मोठी द्रवपदार्थ भरलेली ग्रंथी तयार होते(follicular cysts)
- किंवा कधीकधी बीज बाहेर पडल्यावर बीजकोष संकुचित होत नाही व ते द्रव स्त्रावा ने भरते.(Corpus luteum cyst)
- ह्या सर्व प्रकारच्या ग्रंथी आकाराने कमी जास्त होत राहतात, जातात. ह्यांना Functional cyst असे म्हणतात
- मात्र कधी कधी बीजाची वाढ खुंटते व छोट्या छोट्या अनेक ग्रंथी तयार होतात.ह्याला PCOD म्हणतात अशावेळी उपचाराची गरज असते.
- याशिवाय अश्याही काही ग्रंथी तयार होतात ज्या आपोआप जात नाही . मोठ्या झाल्या तर त्रास होतो.त्या औषधाने जात नाही . सर्जरी ने काढावे लागते.. त्यांना non-functional cyst म्हणतात .
*************
Vd Pratibha Bhave,
No comments:
Post a Comment