- चेहऱ्यावर तांब्याच्या रंगाचे, लालसर, काळपट डाग उठतात त्याला वांग/व्यंग/chloasma/Melasma असे म्हणतात.
- हे डाग melanin नावाच्या पदार्थांच्या आधिक्याने येतात. साधारणपणे स्त्रियांमध्ये वय 18 वर्षे - 50 वर्षे या काळात कधीही येऊ शकतात.
- ज्या स्त्रिया गर्भ निरोधनासाठी गोळया केमिकल्स, इंजक्शन घेतात त्यांच्यामध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येतात. हार्मोन्स च्या असंतुलनामुळे, तसेच काहिंना गर्भिणी अवस्थेत दिसण्यास सुरवात होते.
- वांग येणे हे वंशपरंपरागने देखील दिसून येते.
- ऊन्हात फिरल्याने, शरिरातील उष्णता वाढल्याने, चेहऱ्यावर केमिकल्स युक्त पदार्थांचा वापर, औषधाची अॅलर्जी ह्यामुळे सुध्दा वांग येतात.
- हे डाग साधारणपणे गाल, वरच्या ओठाच्या वरच्या भागावरील त्वचा, मान, नाक, कपाळ ह्यावर येतात
वांग येऊ नये म्हणून
- ऊन्हात जातांना सूर्यकिरण, सूर्यप्रकाश ह्यापासून त्वचेचे रक्षण करा. त्यासाठी स्कार्फ, छत्री, मोठ्या घेराची कॅप वापरा.
- चेहऱ्यावर केमिकल्स युक्त क्लिनझर, साबणाचा वापर करु नका.
- तिखट, चमचमीत, मिरचीचा ठेचा, लोणचे, फास्टफूड असे पदार्थ खाऊ नये. स्वास्थ्यासाठी उत्तम असा आहार विहार करावा. ऋतु नुसार आहार फळे भाजीपाला खावा. मानसिक स्वास्थ्य टिकेल असे बघावे.
वांग निघून जाण्यासाठी उपाय
- प्रवाळ युक्त गुलकंद खावे
- दुधात शतावरी व अनंता उकळून घ्यावे
- अर्जून साल चुर्ण किंवा मंजिष्ठा चुर्ण लोण्यातून चेहऱ्याला लावावा
- ताप्यादी लोह घ्यावे
- पंचतिक्त क्षीरबस्ति घ्याव्या
- जलोका रक्तमोक्षण (Leech Therapy) हे पंचकर्म करुन घ्यावे
टीप :- वरिल सर्व उपचार वैद्यकीय सल्ल्याने करावे.