आयुर्वेदिक औषधी गुणधर्म:-
1) ओवा उष्ण व तीक्ष्ण गुणांचा आहे.
2) प्रसूतिनंतर पोटात दुखत असल्यास 3ग्रॅम ओवा चुर्ण गरम पाण्यात सैंधव मीठ घालून घ्यावा.तसेच ओवा चुर्णाने धुपन द्यावे.
3) वरिल उपायाने गर्भाशयात साठलेला स्राव बाहेर पडतो,पोटात साठलेला वायु बाहेर पडतो,मूत्रप्रवृत्ति होते त्यामुळे पोटदुखी थांबते.
4) नॉर्मल डिलिव्हरी च्या वेळी योनीमार्गात टाके घेतात किंवा कधी कधी ईजा होते, त्यामुळे तेथे वेदना होतात.ओवा चुर्णाने धुपन/धुरी दिल्यास वेदना कमी होतात.
5) ह्याशिवाय धुरी दिल्याने पाठ,कंबर , इत्यादी अवयवांतील वात दोष शांत होतो
6) ओव्याने भूक वाढते,अन्न पचण्याची क्रिया वाढते
7) भूक वाढवण्यासाठी ,अन्नाप्रती रुची वाढवण्यासाठी जेवणाच्या मध्ये 3 ग्रॅम ओवाचुर्ण तूप घालुन खावा.
8) अजीर्णामुळे पोट दुखत असल्यास ओवा सैंधवासह खावा .
9) पोटातील कृमींसाठी ओवातेल/ओवाफुल कापूर एकत्र करावा,ते द्रवरुप होते. ह्या मिश्रणाचे 5थेंब 5ग्रॅम साखरेवर टाकून खावे.
10) वरील मिश्रण उलटी व द्रवमलप्रवृत्ति होत असल्यास दिवसातून 6-7वेळा घ्यावे.
11) प्लीहा वाढली असल्यास(splenomegaly)ओवाचुर्ण ताकातून घ्यावे
12) दंतकृमी मुळे दात दुखत असल्यास ओवाचुर्णाचा लेप दातांना व हिरड्यांना लावावा.
दुष्परिणाम:-
ओवा अधिक प्रमाणात घेतल्यास शुक्रनाश - (oligospermia, asthenospermia azoospermia) होतो.
No comments:
Post a Comment