संस्कृत भाषेत धान्यक म्हणतात.
पानांना कोथिंबीर व बीयांना धणे म्हणतात.
पाने विशेषतः पित्त कमी करणारे आहे. धने बीज जरासे उष्ण गुणाचे आहे.
1) रोजच्या स्वयंपाकात वापरण्यात येणारा असा बहुगुणी व औषधी गुणधर्म असलेला आहे.
2) आयुर्वेदात पानांचा रस तसेच बीयांचे चुर्ण करुन वापरतात
3) वात, पित्त, कफ ह्या तिन्ही दोषांचे संतुलन करणारा आहे
4) भुक वाढवणारे व अन्नाचे पचन करणारे आहे. अजीर्णामुळे पोट दुखत असल्यास धने घालून पाणी प्यावे
5) ताप येत असल्यास उकळत्या पाण्यात धने घालून, ते पाणीथंड करुन दिवसभर प्यावे
6) धने,देवदार,शुंठी,कंटकारी,डोरली,ह्यांचा काढा तापात देतात
7) मुत्राच्या तक्रारींसाठी, लघविला जळजळcystitis, मुतखडा च्या तक्रारीसाठी धणे बियांचा काढा /फाण्ट खडीसाखर घालून देतात
8) दमा, खोकला, असतांना घशाची आग होत असेल तर धण्याचा काढा/फाण्ट खडीसाखर घालून दिल्याने आराम पडतो
9) डोळ्यांची आग होत असल्यास धणे चुर्ण उकळत्या पाण्यात टाकावे. झाकून ठेवावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे. ह्या पाण्याने डोळे धुवावे. आराम पडतो.
संदर्भ :वै. गो. आ. फडके
No comments:
Post a Comment