ह्या 12 केमिकल्स ने कॅन्सर होतो असे 'EWC( European Works Councils) ह्या संस्थेने सांगीतले आहे.
1. प्लास्टिक चा वापर टाळा. त्यामध्ये Bisphenol A (BPA) ह्या नावाचा पदार्थ असतो. तो अन्नामधून शरीरात जातो व त्यामुळे कॅन्सर होतो.
2. पिकाची वाढ खुंटू नये म्हणून Atrazine हे तणनाशक(herbicides) वापरले जाते. ते पाण्यातून आपल्या शरीरात जाते. हा पदार्थ शरीरातील हार्मोन्स असंतुलन करतो तसेच कॅन्सर निर्माण करतो. भाजीपाला स्वच्छ धुवून घ्या, पाणी स्वच्छ गाळून ऊकळून प्या. शक्यतो तांब्याच्या भांड्यात पाणी साठवा.
3. किटकनाशकाची फवारणी पिकांवर करतात.त्यात Organophosphate नावाचा विषारी पदार्थ असतो. तोअन्नातून शरीरात प्रवेश करुन कॅन्सर होतो. म्हणून सेंद्रीय पद्धतीने केलेल्या शेतीमधील च अन्न, धान्य, फळे खा.
4. सौंदर्य प्रसाधने जसे नेलपॉलिश, परफ्यूमस् मधिलDibutyl Phthalate (DBP) नावाचा पदार्थ त्वचेमधून शोषला जाऊन कॅन्सर ला कारणीभूत होतो. म्हणून सौंदर्य प्रसाधने नीट तपासून वापरा,शक्यतोवर नैसर्गिक वापरा. तसेच Dibutyl Phthalate (DBP) नावाचा विषारी पदार्थ रेनकोट व शाॅवर कर्टन मध्ये असतो,त्यामुळे कॅन्सर होतो.
5. पेंट वापरतांना काळजी घ्या. भिंतीवरील जुना पेंट काढतांना किंवा भिंतीची डाग काढतांना Lead हा विषारी पदार्थ शरीरात जाऊन कोणत्याही ठिकाणी कॅन्सर होऊ सकतो.
6. मांसाहारात मासे खात असाल तर अधिक Mercury युक्त असलेले टाळावे. जसे मोठे मासे tuna, swordfish. गर्भिणी अवस्थेत विशेष काळजी घ्यावी
7.फर्निचर किंवा कार्पेट वापरतांना PFCs ह्या केमिकलचा वापर केलेला नाही ह्याची खात्री करून घ्यावी. हा पदार्थ ग्रीस व फर्निचर कोटिंग व कार्पेटसाठी वापरतात
8. परफ्यूमस् मध्ये वापरण्यात येणारा Phthalates हा पदार्थ घातक आहे. ज्या प्राॅडक्टस् मध्ये 'fragrance' असे लिहलेले असते ते वापरु नये.
9. प्लास्टिक खेळणी, भांडी, रेनकोट, टेबलक्लॉथ, शूज, केबल वायर, इत्यादी मध्ये Diethlyhexyl Phthalate नावाचे केमिकल असतात. ही वातावरणात पसरुन शरीरात जातात. म्हणून प्लास्टिकच्या वस्तू वापरणे सोडून द्या.
10 फर्निचर, गाद्या, उशा वस्तूंना ना आग लागण्यापासून पासून सुरक्षित करण्यासाठी कारखान्यात वापरण्यात येणारा PBDEs नावाचे रसायन हे कॅन्सर करणारा आहे. म्हणून परंपरागत वस्तू वापरा.
11. रोज ज्या साबण, सॅनिटायझर, क्लिनझर्स, टुथपेस्टमध्ये, इ. वापरायच्या पदार्थांमध्ये Triclosan नावाचे केमिकल आहे ते कॅन्सर करणारे आहे.
12.सगळीकडे आढळणारा महत्वाचा केमिकल पदार्थ Nonylphenol हा आहे. हा झोपण्याची फोम ची मॅट्रेस, शुज, फुटवेअर, कपडे, पेंट, स्टेन क्लीनर, कपडे, कपडे धुण्याचे पावडर, भांडी धुण्यासाठी चा साबण, घरात वापरण्यात येणारी किटकनाशके, इत्यादी मध्ये आढळतो.
हया केमिकल मुळे कॅन्सर तर होतोच पण गर्भामध्ये जन्मजात विकृति ,हार्मोन्स चे असंतुलन निर्माण होते.
*********************************
कॅन्सरमुक्त व्हायचे असेल तर सेंद्रीय पद्धतिचा अवलंब करा. प्रदेशानुसार परंपरागत पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या आहारीय पदार्थांचा समावेश करा. नैसर्गिकरीत्या बनणारे मीठ आहारात ठेवा.
रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी देशी गायीचे दुध प्या. आंघोळीसाठी, केस धुण्यासाठी, दात स्वच्छ करण्यासाठी वनस्पती औषधी चूर्णे वापरा. रिफाईंड तेलापेक्षा घाण्याचे तेल वापरा.
कपडे विकत आणल्यावर ती आधी स्वच्छ धुऊन मग वापरा.कृत्रिम परफ्यूमस् च्या ऐवजी नैसर्गिक सुंगंधी वापरा. कपडे धुण्यासाठी शक्यतो रिठ्याचा वापर करा. प्लास्टिक घरात दिसणार नाही असा नियम करा.
टीप : करुन तर बघा. स्वतःसाठी अणि आपल्या कुटुंबांसाठी