थंडीमुळे आपल्या त्वचेखाली असलेल्या रक्तवाहिन्या आकुंचीत होतात त्यामुळे ब्लडप्रेशर वाढतो, तसेच थंडीत पाणी कमी प्रमाणात पिल्या जाते. ह्या ऋतुत पचनशक्ति metabolism वाढते. ह्याचा सर्वांचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो व अर्धांगवायू, पॅरॅलिसिस (paralysis) अर्दित (bell's palsy),हार्ट अॅटॅक, रक्तवाहिनी च्या आत पोकळी रक्ताची गुठळी होणे(deep vein thrombosis) असे इमर्जन्सी आजार निर्माण होतात.
ह्या आजारापासून सूरक्षित राहायचे असेल तर आयुर्वेदानुसार थंड ऋतुंमध्ये सांगितलेला आहार व विहार (ऋतुचर्या ) करा.
विशेष म्हणजे आधुनिक शास्त्रात अजूनपर्यंत हा विचारच नाही.
=ही ऋतुचर्यानिरोगी लोकांसाठी आहे =
1) काय खावे? (आहार) -
- तूप, तैल आदि से युक्त पदार्थ खावे. दूधापासून बनवलेले पदार्थ खावे. अम्ल तथा लवण रस युक्त पदार्थ खावे. लाडू, पुऱ्या, शंकरपाळी, अनारसे, श्रीखंड, गुलाबजाम, करंज्या, जिलबी इत्यादी पदार्थ खावे. उडीद व त्यापासून बनवलेले पदार्थ खावे. नेहमीच गरम पाणी प्यावे.
2) काय करावे? (विहार) -
- ह्या ऋतु मध्ये रोज सकाळी तेलाने की मालिश करावी व पुर्ण शरीरालाला उटणे लावावे. माथ्याला तेल मालिश करावी.नाकात तेलाचे थेंब सोडावे. व्यायाम करावा. पूर्ण शरीरातून घाम निघावा म्हणून बाष्पस्नान (steam) करावे. सकाळी उन्हात बसावे.
- घर गरम ठेवावे. गरम कपडे घालावेत. झोपताना उष्ण पांघरूण घ्यावे. घरामध्ये, कामाच्या ठिकाणी, वाहन चालवताना शरीराचे थंड हवेपासून रक्षण करावे.
टीप:- ह्या ऋतुत उपाशी राहणे, कमी खाणे टाळावे. कुठलाही थंडगार पदार्थ खाऊ नये.
No comments:
Post a Comment