Friday, 9 August 2019

आयुर्वेद ~ स्त्रियांसाठी "दार्व्यादी क्वाथ"

1) व्याधी युक्त गर्भाशयातून अधिक प्रमाणात श्वेत स्त्राव व रक्तस्त्राव होत असल्यास ह्या औषधाचा उपयोग केला जातो.
2) ह्या औषधाने गर्भाशयाची  सूज कमी होते
3) गर्भाशय, बीजाशय, बीज वाहिन्या ह्यांना सूज येउन श्वेत स्त्राव होऊ लागतो. आजार अधिक जुना झाल्यावर अंग गळून जाणे, थकवा येणे, डोक दुखणे, कंबर पोट दुखणे, सतत ताप असल्यासारखे वाटणे, दृष्टिमांद्य अशी लक्षणे दिसतात. ह्या विकारात अतिशय उपयोगी आहे 
4) ह्या औषधाने गर्भाशयाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
5) मासिक पाळी पूर्ण महिना भरायच्या आत 15ते 20 दिवसांनी येत असेल किंवा महिनाभर अधे मधे रक्त स्त्राव होत असल्यास ह्या औषधाने पाळी नियमीत होते. 
6) Endometrial hyperplasia, Pelvic inflammatory disease (PID)ह्यात चांगला फायदा होतो
7) Adenomyotic uterus ह्या गर्भाशयाच्या आजारात पाळीच्या वेळी पोटात खूप दुखत व रक्तस्रावही खूप होतो. ह्या औषधाने ही लक्षणे तात्पुरते व तात्काळ कमी होतात. 

बहुगुणी एरंड

1) एरंड ह्या वनस्पती चा आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप उपयोग होतो
2) मूळ, पाने, बीज, तेल ह्यांचा उपयोग केला जातो 
3) गर्भाशयाच्या संबंधीत तक्रारीं-साठी एरंडतेल खुप उपयोगी आहे
4) मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असल्यास एरंडतेलात लसूण, सैंधव, हिंग टाकून देतात
4) पोटातील वायू सरत नसल्यास एरण्ड मूळाचा काढा हिंग व सैंधव मीठासोबत देतात 
5) किडनी स्टोन मुळे वेदना होत  असतिल तर एरंड मूळ काढ्यात यवक्षार टाकून घेतल्याने तात्पुरते बरे वाटते 
6) Rheumatoid arthritis मध्ये एरंड तेलाने सांध्यांना मालिश करुन त्याच्या पानांने शेकल्याने वेदना कमी होतात 
7) एरंडबीजमज्जा समभाग शुंठी व खडीसाखर असे रोज सकाळी उपाशीपोटी खाल्ले असता आमवात (Rheumatoid arthritis) मध्ये वेदना कमी होतात 
8) वातरोगात एरंडबीजपाक अतिशय उत्तम आहे 
9) दमा,मुळव्याधीत पोट साफ होण्यासाठी एरंडतेल देतात 
10) काविळ मध्ये एरंडपानांचा रस साखर मिसळून देतात 
Ref वैद्य गो. आ. फडके 
*एरंड उष्ण गुणाचे आहे त्यामुळे पित्त वाढले असल्यास दिल्या जात नाही
*एरंडबीज विषारी आहे. त्यामुळे औषधात वापरण्यापूर्वी प्रथम आयुर्वेदिक पद्धतीने त्या शुद्ध केल्या जातात.
*महत्त्वाचे : - वरिल औषधी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. 

स्त्रियांसाठी आयुर्वेद उत्तरबस्ति

1) विवाहित महिलांसाठी करावयाचे पंचकर्मापैकी एक आहे. 
2) प्रजननाच्या तसेच गर्भाशयाच्या तक्रारी साठी हा मुख्यतः उपचार आहे. 
3) उत्तरबस्ति करण्यापूर्वी पंचकर्म करुन शरिरशुद्धी करुन घेणे आवश्‍यक असते. 
4) वारंवार गर्भपात, गर्भ न राहणे, पाळीच्या तक्रारी, अधिक किंवा कमी प्रमाणात रजःस्त्राव होणे व वेळी अवेळी पाळी येणे, गर्भाशयात फायब्राॅइड, गाठी होणे, सूज येणे, यात उपयोग होतो. 
5) अधिक प्रमाणात श्वेत स्त्राव होणे ह्यात चांगला फायदा होतो. 

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...