1) एरंड ह्या वनस्पती चा आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप उपयोग होतो
2) मूळ, पाने, बीज, तेल ह्यांचा उपयोग केला जातो
3) गर्भाशयाच्या संबंधीत तक्रारीं-साठी एरंडतेल खुप उपयोगी आहे
4) मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असल्यास एरंडतेलात लसूण, सैंधव, हिंग टाकून देतात
4) पोटातील वायू सरत नसल्यास एरण्ड मूळाचा काढा हिंग व सैंधव मीठासोबत देतात
5) किडनी स्टोन मुळे वेदना होत असतिल तर एरंड मूळ काढ्यात यवक्षार टाकून घेतल्याने तात्पुरते बरे वाटते
6) Rheumatoid arthritis मध्ये एरंड तेलाने सांध्यांना मालिश करुन त्याच्या पानांने शेकल्याने वेदना कमी होतात
7) एरंडबीजमज्जा समभाग शुंठी व खडीसाखर असे रोज सकाळी उपाशीपोटी खाल्ले असता आमवात (Rheumatoid arthritis) मध्ये वेदना कमी होतात
8) वातरोगात एरंडबीजपाक अतिशय उत्तम आहे
9) दमा,मुळव्याधीत पोट साफ होण्यासाठी एरंडतेल देतात
10) काविळ मध्ये एरंडपानांचा रस साखर मिसळून देतात
Ref वैद्य गो. आ. फडके
*एरंड उष्ण गुणाचे आहे त्यामुळे पित्त वाढले असल्यास दिल्या जात नाही
*एरंडबीज विषारी आहे. त्यामुळे औषधात वापरण्यापूर्वी प्रथम आयुर्वेदिक पद्धतीने त्या शुद्ध केल्या जातात.
*महत्त्वाचे : - वरिल औषधी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत.
No comments:
Post a Comment