Friday, 9 August 2019

आयुर्वेद ~ स्त्रियांसाठी "दार्व्यादी क्वाथ"

1) व्याधी युक्त गर्भाशयातून अधिक प्रमाणात श्वेत स्त्राव व रक्तस्त्राव होत असल्यास ह्या औषधाचा उपयोग केला जातो.
2) ह्या औषधाने गर्भाशयाची  सूज कमी होते
3) गर्भाशय, बीजाशय, बीज वाहिन्या ह्यांना सूज येउन श्वेत स्त्राव होऊ लागतो. आजार अधिक जुना झाल्यावर अंग गळून जाणे, थकवा येणे, डोक दुखणे, कंबर पोट दुखणे, सतत ताप असल्यासारखे वाटणे, दृष्टिमांद्य अशी लक्षणे दिसतात. ह्या विकारात अतिशय उपयोगी आहे 
4) ह्या औषधाने गर्भाशयाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
5) मासिक पाळी पूर्ण महिना भरायच्या आत 15ते 20 दिवसांनी येत असेल किंवा महिनाभर अधे मधे रक्त स्त्राव होत असल्यास ह्या औषधाने पाळी नियमीत होते. 
6) Endometrial hyperplasia, Pelvic inflammatory disease (PID)ह्यात चांगला फायदा होतो
7) Adenomyotic uterus ह्या गर्भाशयाच्या आजारात पाळीच्या वेळी पोटात खूप दुखत व रक्तस्रावही खूप होतो. ह्या औषधाने ही लक्षणे तात्पुरते व तात्काळ कमी होतात. 

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...