बस्ति
पावसाळ्यात पंचकर्मातील अग्रगण्य चिकित्सा उपक्रम:-
1)ग्रीष्म(उन्हाळा) ऋतुनंतर वर्षा (पावसाळा)ऋतु येतो.
ग्रीष्मात सर्वत्र रुक्षता असते
2)रुक्षतेमुळे वात शरिरात साठून राहत
3)पावसाळा सुरु झाला कि हवेत गारवा निर्माण होतो.
4)शरिरात साठलेला वात व त्याला थंड वाऱ्याची साथ मिळाली कि वाताच्या तक्रारी निर्माण होतात,जसे अंगदुखी, संधीवात,पचनाच्या तक्रारी.
5)हा वाढलेला , असंतुलित वात कफाला व पित्ताला शरिरात निरनिराळ्या ठिकाणी नेतो व आजार निर्माण करतो,जसे शितपित्त allergy,दमा asthma, अतिसार इत्यादी
6)असंतुलित वायु हा सर्व रोगांचे कारण आहे.त्याचे संतुलन राखले तर कफ व पित्त सुद्धा संतुलित राहतात.
7)बस्ति हा वाताला संतुलित करण्यासाठी पंचकर्मातील श्रेष्ठ उपक्रम आहे.
8)संपुर्ण वर्षभर निरोगी राहण्यासाठी वाताला नियंत्रण करणे आवश्यक आहे.
9) बाल,वृद्ध,स्त्री, पुरुष, तरुण,तरुणी ,निरोगी,रोगी सर्वांनी बस्ति घ्यावा.
10)बस्ति ह्या उपक्रमात गुदमार्गाने आयुर्वेदिक औषधी आत टाकतात.
11)व्यक्तिपरत्वे निरनिराळ्या औषधींचा वापर केला जातो.
12)जसे गाडी नीट चालावी म्हणून आपण वेळच्यावेळी सर्व्हिसिंग करतो तसेच आयुष्याची गाडी सुखपुर्वक चालावी म्हणून दरवर्षी पावसाळ्यात बस्ति घ्यावा.
13) गर्भाशयाच्या, पाळीच्या तक्रारी,PCOD, मुल न होणे Infertility,मुत्रमार्गाच्या तक्रारी,कंबर दुखणे,पायात गोळे येणे, मलबद्धता, मूळव्याध , वारंवार आजारी पडणे, इत्यादी तक्रारींसाठी हमखास बस्ति करावाच.
No comments:
Post a Comment