Tuesday, 27 August 2024

गर्भिणी अवस्थेत बाळाचे वजन वाढवण्यासाठी

 *गर्भाची योग्य प्रकारे वजन न वाढणे(#IUGR) ह्याची आयुर्वेदात अनेक कारणे सांगितली आहेत.

* गर्भाचे वजन वाढावे म्हणून आहारीय पदार्थ, औषधे सांगितली आहेत. 

* तसेच #गर्भिणीचे मन प्रसन्न ठेवावे असे सांगितले आहे.

****************

सकाळी उपाशीपोटी अंडी तुपामध्ये भाजून खावी.

पाण्यातील प्राण्यांचे मांस,जसे मासे तुपामध्ये भाजून खावी

कोंबडीचे मांस खावे

************

#शाकाहारी:-

*उडीदाची साल काढून दूध व पाणी ह्यात कुटून  ते     तुपात शिजवून खावे.

*बकरीचे तूप, बकरीचे दूध प्यावे. *जिवंती,जेष्ठमध,कोकोली अशा जीवनीय औषधी भातामध्ये शिजवून पेज प्यावी.

*   #विदारीकंद ह्या औषधाचा गर्भ वजन वाढण्यासाठी फारच उपयोगी आहे. 

त्यासाठी #जेष्ठमध व विदारीचा काढा दुधात शिजवून पिण्यासाठी दिल्यास गर्भाचे वजन वाढते.

*#वचा घृत, गुग्गुल्वादी घृत,महापैशाचिक घृत, दशमुळ घृत,याचा उपयोग होतो.

*#सारिवा,जेष्ठमध,#काश्मरीफळ हे दुधात शिजवून गाळून साखर मिसळून प्यावे 

*जे पदार्थ गोड चवीची असून वात कमी करतात व मांस वाढवतात अशी पदार्थ गर्भिणी ने खावी.

जसे द्राक्षा, मनुका,बदाम,पिस्ते,खजूर,इत्यादी.

*************

#बस्ती काल प्राप्त झाल्यावर म्हणजे 32 wks झाल्यावर बस्ती द्यावी.

  विशेष #बस्ती सांगितल्या आहेत.त्यांचा चांगला उपयोग होतो. 

             ** दुग्ध सैंधव बस्ती देऊन त्यावर 

विदार्यादी सिद्ध घृत अनुवासन बस्ती .

*************

संदर्भ:- अ. हृ. शा.2/20 अरुण दत्त टीका

          अ. ह्र. चि 21/21,22

          सु. शा.10/57

          अ. सं. शा.4/19-20

          अ . सं. चि.23/12

           च. चि.28/96

***************

टीप:- आयुर्वेदाची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माहिती आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.

काही अवस्थेत ,जसे #gestational diabetes, #hypothyroidism मध्ये असा आहार घेता येत नाही

***************

Vd Pratibha Bhave 

MD Ayu obstetrics and gynecology 

8766740253

Pune

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...