Tuesday, 27 August 2024

गर्भिणी ने कमलकाकडी खावी

-#कमलकाकडी चवीला गोड, तुरट,किंचित कडवट असते

- थंड गुणाची असते.

- #गर्भ राहण्यासाठी,गर्भ टिकण्यासाठी औषध म्हणून आयुर्वेदात ह्याचा उपयोग केला जातो. त्याला #प्रजास्थापन करणारे औषध म्हटले आहे

-#गर्भिणी ला अगदी पहिल्या महिन्यापासून द्यावी.

- दुधात किसून उकळून,खीर, भाजी अश्या अनेक पद्धतीने देता येते. दूध आवडत नसेल तर किसून उकळून त्याचा काढा प्यावा. मळमळ, उलटी थांबते.

- त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी उपयोग होतो.

- गर्भपात थांबण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

- नऊ महिन्यापर्यंत आहारात उपयोग केला तर गर्भ पुष्ट होते.

- तसेच त्यात शरीरातील विषारी तत्त्व काढून टाकण्याचा गुण आहे.

**************

संदर्भ:- सु. शा.10/57

  अ. सं.शा. 4 / 5

  अ. हृ. शा. 2 / 3-6

**पावसाळ्यात ताजी कमळ काकडी मिळते.

**गर्भिणी ने  त्याची भाजी,खीर,काढा जसे आवडेल त्याप्रमाणे आहारात समावेश करावा.

**मी कालच केली भाजी. बनवायला सोपी आहे .मला आवडते. लहान मुले आवडीने खातात. पौष्टिक आहे..

**मी केलेल्या भाजीचा फोटो टाकला आहे.

भाजी दिसायला छान, चवीला छान आणि आरोग्यासाठीही उपयोगी आहे.

***मैत्रिणींनो नक्की करुन बघा आणि कळवा.

**************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune . 

8766740253

************

https://www.instagram.com/reel/C-SoRLCy6mC/?igsh=MWx3NjRwZ2k3bjVrbw==

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...