आपण आरोग्य युक्त असलो तर चारही पुरुषार्थ मिळवणे शक्य आहे. धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत व ते मिळवण्यासाठी मनुष्याने प्रयत्नशील रहावे असे आयुर्वेदाचे मत आहे.
1) धर्म - धर्म म्हणजे जो धारण केला जातो. जीवन जगताना साधारण नियम जे उपजतच आपण पाळतो तो धर्म.
2) अर्थ - संपत्ती
3) काम - सुखादी उपभोग,
4) मोक्ष - अलौकिक सुख
परंतु रोग झाले की मनुष्य लौकिक व अलौकिक दोन्ही प्रकारच्या सुखापासून आपोआपच दूर राहतो.
म्हणून बुद्धिवान मनुष्याने सुखाचे मूळ हे आरोग्य आहे हे लक्षात घ्यावे.निरोगी राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असावे
**धर्मार्थ काम मोक्षणामारोग्यं मूलमुत्तमम् l
रोगास्तस्यापहर्तार: श्रेयसो जीवितस्य च l
प्रादुर्भूतो मनुष्याणामन्तरायो महनयम् ll
च. सू.1/15-16
Vd Pratibha Bhave pune
No comments:
Post a Comment