Sunday, 4 June 2023

Shatawari root


Shatawari roots are used as

  • Galactagogue , increases breast milk .
  • Spermatogenic,help to increase formation and development of sperms in male.
  • neuromuscular tonic.

It nurishes senses and promotes intellect.               


Vd. Pratibha Bhave,

Pune, 

Ayurvedic Gynaecologist

आरोग्य हे पुरुषार्थासाठी आवश्यक आहे

आपण आरोग्य युक्त असलो तर चारही पुरुषार्थ मिळवणे शक्य आहे. धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत व ते मिळवण्यासाठी मनुष्याने प्रयत्नशील रहावे असे आयुर्वेदाचे मत आहे.

1) धर्म - धर्म म्हणजे जो धारण केला जातो. जीवन जगताना साधारण नियम जे उपजतच  आपण पाळतो तो धर्म.

2) अर्थ - संपत्ती 

3) काम - सुखादी उपभोग,

4) मोक्ष - अलौकिक सुख

परंतु रोग झाले की मनुष्य  लौकिक व अलौकिक दोन्ही प्रकारच्या सुखापासून आपोआपच दूर राहतो.

म्हणून बुद्धिवान मनुष्याने सुखाचे मूळ हे आरोग्य आहे हे लक्षात घ्यावे.निरोगी राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असावे


**धर्मार्थ काम मोक्षणामारोग्यं  मूलमुत्तमम् l

रोगास्तस्यापहर्तार: श्रेयसो जीवितस्य च l

प्रादुर्भूतो मनुष्याणामन्तरायो महनयम् ll

                  च. सू.1/15-16

Vd Pratibha Bhave pune

मुखलेप (Ayurvedic face pack)


1) चेहऱ्याला लेप, वर्ण्य तेल लावायची पद्धत खूप जूनी आहे . 

चेहऱ्यावर पिंपल्स,वांग येणे, काळ वंडणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे, पुरळ येणे, कोरडे पडणे,अधिक तेलकट होणे अशा अनेक तक्रारी निर्माण होतात.

2) 'पी हळद आणि हो गोरी 'असेही प्रचलात आहे

3) आयुर्वेदिक लेप घरच्या घरी लावता येतात. 

4) याशिवाय अशा तक्रारी का दिसतात त्याचे कारण शोधून आहारात बदल केला जातो.

5) आवश्यकता वाटल्यास औषधे, गोळया दिल्या जातात

6) वांग, पिंपल्स असल्यास leech थेरपी सुद्धा केली जाते.

7) PCOS मुळे चेहरा काळपट पडला असेल तर वमन,विरेचन,बस्ती, मुखलेप केल्यावर चेहरा चांगला उजळतो तसेच पाळीसुद्धा नियमित होते. पंचकर्म केल्याने हार्मोन्स संतुलित होत असल्यामुळे शरीरात चांगला बदल घडून येतो.


Vd Pratibha Bhave, Pune

8766740253

रोज डोक्याला तेल का लावावे?


# आयुर्वेद मते -

1) जो मनुष्य रोज डोक्याला तेल लावून डोके थोडे ओलसर ठेवतो त्याचे डोके कधीच दुखत नाही

2) वयाच्या आधी पिकत नाही , गळत नाही तसेच लवकर टक्कल पडत नाही

3) डोक्याची हाडे अधिक मजबूत होतात

4) केस लांब, काळे व मजबूत होतात

5) ज्ञानेंद्रिये शक्तियुक्त, प्रसन्न होतात.

6) त्वचा सुंदर व निर्मळ होते

7) डोक्याला तेलाने #मालीश केल्यास छान झोप येते.


संदर्भ - च.सू.5/81-83

***********

डोक्याला तेल लावण्याच्या चार पद्धती आचार्य वाग्भट यांनी सांगितल्या आहेत -

1) #शिरोभ्यंग - म्हणजे डोक्याला तेलाने मालिश करणे

2) #शिरोधारा - डोक्यावर तेलाची धार सोडणे

3) #शिरोपिचू - कापसाचा बोळा तेलात भिजवून तो डोक्यावर ठेवणे

4) #शिरोबस्ति -  डोक्यावर उंच  टोपी घालून त्यात तेल भरले जाते 

आजारपण ज्या प्रकारचे असेल त्याप्रमाणे ते ठरवले जाते 


Vd. Pratibha Bhave,Pune

पंचकर्म

शरीरात घातक, विषारी पदार्थ साठले की पंचकर्मातील वमन, विरेचन हे कर्म करावे.

# वमन म्हणजे आयुर्वेदिक औषधाने शरीरातील विषारी पदार्थ उलटी करून बाहेर काढणे.

# विरेचन म्हणजे विषारी पदार्थ शौचावाटे बाहेर काढणे.


* आपल्या शरीरात खूप दोष,विषारी पदार्थ साठले आहेत हे लक्षणाने कसे ओळखायचे हे आयुर्वेदात सांगितले आहे.

ही लक्षणे पुढील प्रमाणे –

  • अन्नाचे पचन न होणे, अन्न बेचव वाटणे
  • लठ्ठपणा येणे, त्वचेचा पांढरटपणा,शरीर जड वाटणे, विनाकारण थकवा येणे,थोडे काम केले तरी थकवा वाटणे, दुर्बलता येणे
  • शरीरावर छोट्या छोट्या पुळ्या येणे,चट्टे येणे,खाज येणे, दुर्गंध येणे
  • शरीर व मनात उदासीनता येणे, 
  • मळमळ होणे,उलटी होणे, पित्त कफ पडणे
  • झोप न येणे किंवा खूप झोप येणे, सारखे झोपावे असे वाटणे,
  • नपुंसकत्व 
  • बुध्दी न चालणे,
  • अशुभ स्वप्न पडणे
  • पौष्टिक पदार्थांचे भरपूर सेवन केले तरी शरीरातील ताकद कमी होणे, तेज कमी होणे.


ही सर्व  लक्षणांना आयुर्वेदात  'बहुदोषा ' म्हटले आहे. संदर्भ च. सू.16/16

अशा व्यक्तींना त्याचे बळ व दोष कसे आहेत ह्याचे परीक्षण करून मग वमन विरेचन केले जाते.


Vd Pratibha Bhave,Pune 8766740253

बल, ताकत # रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक


आयुर्वेदात बल वाढवणारे 13 घटक सूत्र रुपात सांगितले आहेत.संदर्भ च. शा.6/13

1) बलवान व्यक्तींच्या देशात जन्म

 (देशाचा -वातावरणाचा परिणाम) जसे पंजाब

2) बलवान व्यक्तींच्या घरात जन्म (माता- पिता प्रमाणे)

3) बलवान काळात जन्म 

     (विसर्ग काळ-वर्षा शरद हेमंत ऋतु  )

4) काळ,ऋतु चे योग्य असणे. समयोग असणे

5) स्त्रीबीज,पुरुषबीज, व गर्भाशय उत्तम गुणाने युक्त असणे. ह्यात कुठलाही आजार नसावा

6) पथ्यकर आहार निरंतर घेणे

7) शरीराचे संपूर्ण अवयव परिपूर्ण असणे

8) पौष्टीक आहार पचवण्यास समर्थ असणे

9) मन सद्गुण युक्त असणे

10) नैसर्गिकपणे  बल निर्माण होणे

11) युवावस्था

12) बल वाढवण्यासाठी व्यायाम,आसन इत्यादी कर्म करणे

13) प्रसन्न असणे. चिंता शोक इत्यादींपासून दूर राहून नेहमी निरंतर प्रसन्न राहणे.


ह्या सर्व घटकांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की बलवान अपत्य जन्माला येण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले तर शक्य आहे. कोणत्या महिन्यात गर्भधारणा करावी, कधी करावी, आहार कसा घ्यावा, पथ्यकर आहार म्हणजे काय हे भावी पालकाने समजून घ्यावे.

#पंचकर्म #उत्तरबस्ती, आहाराने  शरीर,मन,बीज, #गर्भाशय शुद्धी करुन मगच गर्भधारणा करावी.

Vd Pratibha Bhave Pune

8766740253

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...