निरोगी, दीर्घ, मेधायुक्त, सुंदर आयुष्यासाठी
बाल्यावस्था संपल्यानंतर युवावस्थेत पंचकर्म करुन शुद्ध झाल्यावर रसायन चिकित्सा करावी. त्यामुळे स्मरणशक्ती, बुद्धी, आरोग्य, आयुष्य, सौंदर्य, प्रभा, स्वर, ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रिय शक्ति, वाक् सिद्ध, शुक्रविपूलता, शरीरातील सर्व रसरक्तादी उत्तम प्रतीचे तयार होतात.
तरुणांनी नियमितपणे नियमानुसार रसायन सेवन करावे.
************
अनेक रसायन कल्पांपैकी एक सोपा कल्प:-
-शतावरी कल्क कषाय सिद्ध ये सर्पिरश्नन्ति सिताद्वितीयम् l
ताञ् जीविताध्वानमभिप्रपन्नान्न विप्रलुम्पन्ति विकारचौराः llअं. ह्र. उ. 39/156
शतावरी वाटून घ्यावे तयार होणाऱ्या पिंडाला कल्क म्हणतात. तसेच शतावरी चा काढा करुन घ्यावा. हे दोन्ही तूपात शिजवले असता शतावरी घृत तयार होते. हे तूप खडीसाखर सोबत खाल्ले तर मनुष्याला जीवनरुपी रस्त्यावर चालतांना रोगरुपी चोर लूटू शकत नाही. म्हणजे तो आजारी पडत नाही.
टीप:-रसायन सेवन नेहमीच शरीरशुद्धी केल्यावरच व तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावे असा शास्त्राचा नियम आहे,अन्यथा रोग उत्पन्न होतात.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Prasutitantra Streeroga
No comments:
Post a Comment