Thursday, 10 December 2020

अन्नपदार्थ पचायला हलके किंवा जड कसे ओळखायचे?

सर्व अन्न पदार्थ पचायला हलके किंवा जड कसे असतात ते स्वतःला निरिक्षण करुन ठरवता येतात.   जगातील सर्वच आहार पदार्थाचे वर्गीकरण करता येणे अवघड आहे असे आयुर्वेद सांगतो. च. सू.अध्याय 27

1) अन्नपदार्थ वनस्पती (शाकाहार) जन्य असो वा प्राणिज(मांसाहार), ते कुठे व कसे उत्पन्न झाले ,स्त्रीलिंगी की पुल्लिंगी आहे, ते कशा पद्धतीने शिजवले आहे ह्यावर पदार्थांचा जडपणा व हलकेपणा अवलंबून आहे. अधिक पाण्यात निर्माण होणारे पदार्थ पचायला जड असतात. 
जसे
2) सफरचंद पेक्षा केळी पचायला जड आहेत. शिंगडा जड आहे. राजगिरा हलका. 
3) नविन तांदुळाचा भात पचायला जड असतो, त्याच्या लाह्या हलक्या असतात. कुकरमध्ये केलेला भात जड व मोकळ्या भांड्यात झाकण न ठेवता शिजवलेला भात हलका असतो
4) काही अन्न पदार्थ स्वभावतःच जड असतात. जसे मूगापेक्षा, हरभरा व त्यापेक्षा उडीद, राजमा जड असतो
5) मांसाहार करणाऱ्यांना असे ठरवता येईल. 
बकऱ्यापेक्षा बकरीचे मास हलके बांधून ठेवलेल्या बकऱ्यापेक्षा चरणाऱ्या मोकळ्या बकऱ्याचे मांस हलके. कोंबडीच्या बाबतीत हेच लागू होते

टीप:
पचायला जड पदार्थ कमी प्रमाणात घेतली तर पचायला हलके जातात, तर हलकी पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यावर जड ठरतात. म्हणून भोजन यज्ञकर्म आहे हे लक्षात घ्या व निरोगी राहण्यासाठी भरपूर प्रयत्न करा. 

Tuesday, 1 December 2020

केसांच्या व डोक्याच्या तक्रारींसाठी

 डोक्याला  तेल लावण्याचे प्रकार 

1)शिरो- अभ्यंग
2)शिरो- परिषेक
3)शिरो- पिचू
4)शिरो-बस्ति 

************************
1)शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला औषधीयुक्त तेलाने हळूहळू मालिश करणे. 
साधारणपणे डोकयातील त्वचा कोरडी पडली असेल, खाज येत असेल, मलिन झाली असेल तर केल्या जाते
2)परिषेक म्हणजे औषधीयुक्त तैल डोक्यावर शिंपडणे. 
डोक्यात फोडे, जखमा, होणे. डोके दुखणे आग होणे अशा तक्रारींसाठी ह्याचा उपयोग होतो
3)शिरोपिचू- ह्यात डोक्याच्या पुढच्या भागी(Anterior fontanel) औषधीतेलयुक्त कापसाचा/कापडी तुकडा ठेवतात. केस गळणे, डोक्याच्या त्वचेवर चिरा पडणे, धूपनाच्यावेळी, नेत्रस्तंभ(eyelid dysfunction) अशा आजारात करतात 
4)शिरो-बस्ति - 
यंत्राच्या साहाय्याने अर्धा ते एक लिटर औषधीयुक्त तेल डोक्यावर ठेवले जाते. 
डोके बधिर होणे, अर्दित (bell's palsy), रात्री जागरण करणे, नाक व मुख,तोंड कोरडे पडणे, तिमिर cataract, साध्या उपायांनी बरे न होणारे डोक्याचे आजार ह्यात उपयोग होतो. 

************************

नियमितपणे केसांना तेल लावल्यास होणारे फायदे 
1)केस गळत नाही, पांढरे किंवा भुरे होत नाही.
2) डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही. 
3)वाता मुळे होणारे रोग नष्ट होतात
4)ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रियांची कार्य शक्ती वाढते
5)आवाज, स्वर चांगला होतो
6)हनुवटी(lower jaw) व शिर ह्यांची कार्यशक्ती वाढते

संदर्भ - अ. हृ. सू. 23

पाळी वेळेत येत नाही? बीज नीट तयार होत नाही?

 सोनोग्राफी मध्ये PCOD असा रिपोर्ट आहे का? डॉक्टरांनी PCOS आहे असे सांगितले का? 

कुठल्या प्रकारचा PCOS आहे ते जाणून घ्या व आयुर्वेदिक उपचार घ्या 

***************************************** 


PCOS चे प्रकार 

1)Insulin-Resistant Type of PCOS

ह्यात रक्तातील साखर संतुलित राखणे महत्त्वाचे असते 


2)Inflammatory Type of PCOS

hs CRP ही टेस्ट केल्यावर positive येते. त्यानुसार आहार व औषधी दिल्या जातात 


3)Post pill Type PCOS

ह्या प्रकारात हार्मोन्स च्याऔषधांचा परीणाम होऊन पाळीच्या तक्रारी निर्माण होतात 


4) Adrenal Type of PCOS

ह्यात महत्त्वाचे म्हणजे prolactin सुद्धा वाढलेले असते. 


5) Hidden Cause Type of PCOS

ह्यात Hypothyroidism असणे,तसेच zinc, vitD, iodone ची कमतरता. Prolactin वाढलेले असणे. कारण शोधून त्यानुसार उपचार केले जातात. 


6)Lean Type of PCOS

ह्या प्रकारात स्त्रियांची शरीरयष्टी बारीक असते.

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...