दुखण्याची कारणे:-
- ह्याचे मुख्य कारण शरीरात होणारा हार्मोन्स चा बदल हे आहे. Relaxin व progesterone हे गर्भिणी अवस्थेत मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.प्रसूति होण्यासाठी निसर्गाने केलेली ही तयारी असते. परंतु प्रसूति झाल्यावर सुध्दा ते हार्मोन्स शरीरात राहतात त्यामुळे कंबरेचे पाठीचे दुखणे निर्माण होते.
- गर्भिणी अवस्थेत गर्भाच्या भारामुळे कंबरेवर ताण येतो व कंबरेचे दुखणे गर्भिणी अवस्थेत सुरु होऊन प्रसूति(delivery) झाल्यावर सुद्धा राहते
- जर नाॅर्मल डिलिव्हरी झाली असेल तर कळा घेतांना कंबरेच्या स्नायुंवर ताण येऊन प्रसूति नंतर कंबर दुखते
- प्रसूति झाल्यावर योग्य विश्रांती मिळत नसेल, पुरेशी झोप मिळत नसेल, बाळाला सारखे उचलणे ह्यामुळे दुखणे वाढते.
- दुध पाजतांना बसण्याची पद्धत योग्य नसेल तर पाठीच्या कण्यावर ताण पडतो व कंबर, पाठ, मान दुखू लागते.
प्रसूति नंतर कंबर पाठ दुखू नये म्हणून
- प्रसूतिनंतर बला तेलाने मालिश, शेक, पोटपट्टा बांधावा
- अहळीवाची, खसखसची खीर दुधात बनवून प्यावी
- शतावरी कल्प, बाळंत काढा, दशमुलारीष्ट, डिंकलाडु घ्यावे
- पूर्ण विश्रांती घ्यावी. जागरण करु नये. दुध पाजण्याची पद्धत शिकून घ्यावी. जड वस्तू उचलू नये.
- मांसाहारी असाल तर मटन, चिकन सूप, अंडी ह्याचा आहारात समावेश करावा.
साधारणपणे प्रसूतिनंतर 6 महिन्यापर्यंत दुखणे थांबते. त्यानंतरही दुखणे असेल तर वैद्यकीय सल्ल्या, उपचार करावे.
No comments:
Post a Comment