मुरूम / Pimples / Acne घालविण्यासाठी :-
आयुर्वेदात मुरुम, Pimples, Acne ह्याला मुखदूषिका म्हणतात.
आधुनीक शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुरूम होण्याची कारणे:-
1) हार्मोन्स मधिल बदल
2) तणाव
3) वांशिक
4) बॅक्टेरीया
मुरुमांचे प्रकार:-
• पांढरे कण असलेले whiteheads.
• काळे कण असलेले blackheads.
• पुययुक्त pustules.
• लालसर सुजयुक्त papules.
• ग्रंथीयुक्त cysts.
• गाठीयुक्त nodules.
आधुनिक उपचार पद्धती:-
1) Antibiotics
2) Hormones
3) Chemical Ointments locally
4) Phototherapy
5) Lesions removal
************************
आयुर्वेदिक उपचार पद्धती:-
*************************
आयुर्वेद मते दुषित वात व कफामुळे मुखदुषिका होतात.
1) मुखदुषिकेला लोध्र,धने,वेखंडा चा लेप करावा.
2) नारियल शुक्ति व वडाचे कोवळे पान वाटुन लेप करावा.
ह्याने फायदा झाला नाही तर
3) प्रामुख्याने वमन ह्या पंचकर्म प्रकाराचा फार फायदा होतो.
4) मुरूम लालीयुक्त,आगयुक्त,वेदनायुक्त असल्यास जळवा लावल्याने तेथे साठलेले दुषित रक्त निघून जाते व त्वचा लवकर पुर्ववत होते (leech therapy).
5) त्वचेवरिल चिकटपणा,मलिनपणा जाण्यासाठी औषधी तेल नाकात टाकतात.(नस्य).
6) त्वचा शुध्द करणाऱ्या औषधी ,जसे पंचतिक्तघृत,मंजिष्ठा,सारिवा, हरिद्रा,त्रिफळा इत्यादी मुरुमांच्या प्रकारानुसार पोटातून दिली जातात.
7) पिंपल्स सोबत पचनाच्या , पाळीच्या तक्रारी असतिल तर त्यानुसार औषधी दिल्या जातात.
8) वात कफाचे संतुलन राखण्यासाठी आहाराबद्दल मार्गदर्शन केले जाते.
Vd Pratibha Bhave