1) साधारणतः वय 45-50 ह्यात स्त्रियांच्या शरिरातील इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ह्या हार्मोन्सची कमतरता निर्माण होते. पाळी गेल्यावर इस्ट्रोजन अतिशय कमी प्रमाणात तयार होते.
2) शरिरातील इस्ट्रोजन च्या प्रमाणाशी मेंदू च्या ज्ञानात्मक कार्याचा खुप जवळचा संबंध आहे.
3) इस्ट्रोजन च्या कमतरतेमुळे विसरायला होणे, चिडचिडेपणा वाढणे, निर्णय क्षमता कमी होणे, विचारांचा गोंधळ होणे,शांत झोप न येणे इत्यादी लक्षणे निर्माण होतात.
4) पाळी गेल्यावर 2-3वर्षात शरिर आहे तसे अल्पप्रमाणातील इस्ट्रोजनला वापरुन मेंदूचे कार्य पुर्ववत करतो.
5) परंतु सर्वांमध्ये पुर्ववत होतेच असे नाही. म्हणून सर्वच स्त्रियांनी ह्या वयात वैद्यांचा सल्ला जरुर घ्यावा.
6) अॅलोपॅथी मध्ये पाळी जातांना हार्मोन्स कमी होतात म्हणून कृत्रिम हार्मोन्स दिली जातात.झोप येत नसल्यास झोपेच्या गोळ्या देतात.रुग्णाला तात्पुरते बरे वाटते परंतु त्यांचे बरेच साइड इफेक्ट्स आहेत व ही पुर्ण चिकित्सा नव्हे.त्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती चांगला फायदा होतो.
7) आयुर्वेदिक उपचार-
-1 औषधीयुक्त तेलाने मालिश- दशमूळतेल/नारायण तेल/महानारायणतेल
-2 नस्य अणूतैल/पंचेन्द्रियवर्धनतैल
-3 शिरोभ्यंग/शिरोधारा/शिरोपिचू- श्रीगोपालम/माकातैल/जटामांसी तैल
-4 पादाभ्यंग-नारिकेल/चंदनबला
-5 बस्ती-अनुवासन/निरुह/मात्रा
-6 प्राणायाम
-7 आहाराचे नियम पाळावे
8 औषधी-नारसिंहरसायन,च्यवनप्राश,गुडूची,आमलकी,शंखपुष्पी,ब्राम्ही,वचा,विदारीकंद,बला,अश्वगंधा,कोकीलाक्ष, औषधी युक्त दूध-तूप,सुवर्णभस्म,लोहभस्म,ताप्यादीलोह,
इत्यादी औषधी प्रकृतीनुरूप दिल्यास मानसिक स्वास्थ्यासाठी बराच फायदा होतो.
*****औषधी मात्र वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावी ;अन्यथा फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता निर्माण होते*****
No comments:
Post a Comment