उसाच्या रसाचे गुणधर्म:-
आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे – अ.हृ.सू.5/42-46
1) मृदु रेचक (पोट साफ करणारे), पचायला जड व ताकद वाढविणारा आहे
2) हा स्निग्ध गुणयुक्त आहे
3) कफ व मुत्र वाढवणारा आहे
4) शुक्र वाढविणारा आहे
5) रक्तातिल उष्णता कमी करणारा आहे
6) शरीरातील, पित्तातील उष्णता कमी करणारा आहे
7) चवीला अतिशय गोड व रक्तात मधुरता निर्माण करणारा आहे
8) उसाचा अगदी वरचा शेंडा अल्प खारट चवीचा असतो
9) यंत्राने रस काढतांना उसाचा मूळाकडील भाग, शेंड्याकडील भाग,किडलेला भाग हे सर्व एकत्र यंत्रात टाकली जातात.तसेच यंत्रात असलेला मल मिसळल्याने, व थोडा रस काही काळ तेथेच पडून राहिल्याने रसाचे गुण बदलतात.
हा रस अम्लपित्त , मलप्रवृत्तिला कष्ट देणारा,विष्टंभी, पचायला जड आहे
10) पौण्डा जातीचा ऊस सर्वात श्रेष्ठ व नैपाल जातीचा कनिष्ठ आहे.
*****उसाचा रस प्यायचा झाल्यास त्याचा शेंड्याकडील , मुळाकडील भाग काढून घ्यावा.किड तपासून घ्यावी.यंत्राची, भांड्यांची स्वच्छता बघावी.जरासे आले,लिंबु घालावे म्हणजे पचायला मदत होते.बर्फ न घालता घेतल्यास आरोग्यासाठी चांगले असते.******
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसर्व जनांना उपयोगी पोस्ट ! great going
ReplyDelete