मी म्हटले “तूझी मेहनत, इच्छा आणि अथक प्रयत्न“
आणि त्यामुळे दणदणीत यश.
**********
दोघेही दिनांक 14/09/23 ला माझ्याकडे आले
लग्नाला 6वर्षे झाली होती
वय:- 26वर्षे
शिक्षण B.A . गृहिणी
उंची 5फूट 3 इंच.वजन 58.7kg
*********
*त्यांना साडे चार वर्षाचे एक मूल होते.(Full term normal delivery)
*त्यानंतर Aug 2022 म्हणजे 1वर्षापूर्वी
12 आठवड्याचे spontaneous abortion झाले होते.
*त्यानंतर 6महिने प्रयत्न करुनही गर्भधारणा झाली नाही(secondary #infertility) . मिस्टरांचे वीर्य तपासणीचे रिपोर्ट्स नॉर्मल होते.
***********
वारंवार तोंडाला फोड येणे(मुखपाक) हे प्रमूख लक्षण होते. मलमूत्रप्रवृत्ती उत्तम. जिव्हा - रक्त वर्ण
नाडी - उष्ण, तनू
*********
#Abortion झाल्यापासून पाळी दीड दोन महिन्याच्या अंतराने येऊ लागली होती.
स्त्रावाचे प्रमाण
कमी #pcod ची सुरवात होती .
दिनांक 14/09/2023 ला1महिन्याची औषधे दिली.
कामदुधा , कुमारी आसव , शतावरी कल्प दिले.
*पण औषध देऊन 06/10/23 पर्यन्त पाळी आली नाही . urine pregnancy test negative आली.
मग पाळी येण्यासाठी #बस्ती #उत्तरबस्ती दिली . व रजप्रवर्तिनी वटी दिली.
दिनांक 12/10/2023 ला पाळी आली
पाळी 5दिवस होती.
त्यानंतर पुन्हा 17/10/23पासून पुढे 5दिवस क्षीर बस्ती दिल्या
कामदुधा , कुमारी आसव , शतावरी कल्प दिले. ही औषधे 1महिना दिली.
16/11/23 ला पाळी आली. 21तारखेपासून पुन्हा बस्ती उत्तरबस्ती दिली. औषधे मागील महिन्याप्रमाणे दिली.
पुढे 20डिसेंबर पर्यंत पाळी आली नाही.urine pregnancy test negative.
** त्यामुळे पाळी येण्यासाठी तिळाचा काढा सकाळी उपाशीपोटी घ्यायला सांगितला.
सर्व गोळ्या सुरु ठेवल्या.29/12/2023 ला पाळी आली.
पुन्हा 02/01/2024 पासून बस्ती उत्तरबस्ती केली.
यावेळी नाडी ची सुधारणा झाली. सारखे तोंड येण्याची तक्रार पूर्णपणे थांबली.
यावेळी रजप्रवर्तिनी , लताकरंजं, शतावरी, कुमारी आसव दिले . पुढे 4महिने हेच औषध सुरू ठेवले.
मिस्टरांना #अश्वगंधा वटी व आमच्याकडील combination #शुक्र चूर्ण दिले.
दोघांची औषधे सुरू ठेवली. पाळी चुकल्यावर 10दिवस थांबून Urine pregnancy test करावे असे सुचवले.
**माझ्याकडे येण्याच्या तीन महिने आधीचा व आमच्याकडे आल्यावर उपचार करतांना पाळीचा पॅटर्न पुढीलप्रमाणे होता.
20/05/23
25/07/23
30/08/23
12/10/23
16/11/23
29/12/23
30/01/2024
10/03/2024
15/04/2024
20/05/2024
LMP 01/07/2024
ला पाळी येऊन गेली.
आता नियमित पाळी झाली त्यामुळे pregnancy नक्की राहणार होती.
05/08/2024ला urine pregnancy test positive आली. खूप आनंद झाला .
***************
सोनोग्राफी मध्ये #twins आहे असा report आला. Sonography नुसार delivery ची तारीख 05/04/2025 ही आली
***********
आता तिला एकूण 3बाळ असणार होते पण ती खुश होती. खूप मुले असणे तिची आवड आहे.
गर्भ मासानुमासे ते योग्य प्रकारे वाढत गेले.
***********
पूर्वी 12आठवडे चे गर्भपात झाले असल्यामुळे व यावेळी twins असल्यामुळे गर्भाच्या पिशवीला टाका घालावा लागेल असे वाटले होते पण गरज भासली नाही.
***********
दिनांक 24/03/2025 ला #सिजेरियन पध्दतीने प्रसूति झाली. पूर्ण दिवसांचे दणदणीत बाळे जन्माला आली.
#आयुर्वेदाला आधुनिक शास्त्राची जोड, ह्यामुळेच सर्व शक्य झाले हे महत्वाचे.
*******
मुलगा चे वजन 3500gms
मुलीचे चे वजन 2500gms
दोन्ही बाळ एवढ्या वजनाचे, सुंदर आणि स्वस्थ आहेत.
विश्वास बसत नाही ना?
सर्व प्रत्यक्षात घडत आहे, फक्त डोळस विश्वास हवा.
**********,
14/09/2023 ला पेशंट आली
01/07/2024 ला शेवटची पाळी आली(LMP).
24/03/2025ला डिलिव्हरी झाली.Twins.
***************
आपले आशीर्वाद व आयुर्वेदावर विश्वास ह्यामुळे आपण यशस्वी होत आहोत असे वाटते.
*************
Vd Pratibha Bhave
Ayurvedic Gynaecologist
Pune
8766740253
No comments:
Post a Comment