Tuesday, 10 August 2021

PCOD (Polycystic ovarian syndrome) म्हणजे काय? त्यावर उपाय.

1) साधारणपणे पाळीची सुरवात झाल्यावर दर महिन्याला बीजग्रंथी मध्ये बीज योग्य आकाराचे तयार होणे व बाहेर पडणे  हे आवश्यक आहे. तसे न होता ते पूर्ण वाढत नाही व बीजग्रंथी मध्येच साठून राहतात. 

सोनोग्राफी केल्यावर ती साठलेली सर्व बीजे एक मोत्याची माळ असल्याप्रमाणे दिसतात. तसेच रक्तात मुख्यतः Aldosterone व insulin चे प्रमाण वाढते. चेहऱ्यावर पोटावर छातीवर, केस येऊ लागतात, डोक्याची केस कमी होतात, अशी हार्मोन्स असंतुलना ची लक्षणे निर्माण होतात. ह्यालाच  PCOD/PCOS म्हणतात 

2) PCOD/PCOS हे एका दिवसात घडणारा आजार नव्हे. असे घडायला मुख्य कारण वजन वाढणे व व्यायामाचा अभाव हे आहे. कधी कधी वंशपरंपरेने सुद्धा दिसूनयेतो.  कधी कधी बारीक (कृश) स्त्रियांमध्ये सुद्धा PCOD आढळतो. 

3) शरीराचे वजन वाढले म्हणजे शरीरातील प्रत्येक घटकांमध्ये प्राकृत काम करण्याच्या प्रक्रियेत बिघाड व्हायला सुरुवात होते, जसे पाळी मध्ये बदल, गर्भधारणा न होणे, गर्भिणी अवस्थेत साखर वाढणे, रक्तदाब वाढणे, चालतांना दम लागणे, वारंवार सर्दी होणे, सारखी भूक लागणे, घोरणे, उत्साह कमी होणे, अतिशय घाम येणे, डोके दुखणे, त्वचेचा वर्ण काळपट होणे, लघवीच्या तक्रारी, अम्लपित्त अशी अनेक लक्षणे निर्माण होतात 

4) आयुर्वेदामध्ये रोगाच्या  कारणानुसार उपचार केले जातात.

5) PCOD /PCOS मध्ये रस, रक्त, मांस, मेद हे दुषित होतात त्यांना स्वच्छ करण्यासाठी औषध द्यावी लागतात. 

6) तसेच शरीरात छोट्या छोट्या घटकांना पोषक तत्व पुरवण्यामध्ये  'क्लेद' हा पदार्थ अडथळा करत असतो, तो दूर करण्यासाठी औषधे दिली जातात, वमन, विरेचन केले जाते. 

7) बीज वेळेत फुटणे, पाळी वेळेवर येणे, हे कार्य अपान वायुचे आहे ते कार्य बिघडलेले असते. ते ठीक करण्यासाठी  औषधे, बस्ति दिल्या जातात 

8) बीज चांगल्या प्रतिचे तयार होणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यासाठी औषध, पंचकर्म हे उपचार केले जातात 

9) वजन कमी करणे, पथ्यापथ्य, दिनचर्ये चे पालन करणे, आवश्यकतेनुसार औषध व पंचकर्म  केल्याने PCOD/PCOS आयुर्वेदाने पूर्ण बरा होतो. 

10) साधारणपणे पुष्पधन्वारस, लघुमालिनी वसंत, महायोगगुग्गुळ, चंद्रप्रभा वटी, दशमुलारीष्ट, च्यवनप्राश, वसंतकुसूमाकर, फलघृत, गोक्षुर, पुनर्नवा, कांचनार, लताकरंज, कुमारी आसव अशी अनेक औषधी रुग्णाचे वय, दोष, दुष्य, बल, काल, प्रकृति इत्यादींचा विचार करुन दिली जातात 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD (Prasutitantra Streeroga)

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...