Thursday, 11 March 2021
शिंका येणे, सर्दी, नाक चोंदणे, डोळ्यात पाणी, डोके दुखणे, खोकला, हातपाय दुखणे, ताप येणे अशी लक्षणे निर्माण झाल्यावर
शिंका येणे, सर्दी, नाक चोंदणे, डोळ्यात पाणी, डोके दुखणे, खोकला, हातपाय दुखणे,ताप येणे अशी लक्षणे निर्माण झाल्यावर Anacin, coldarin अशी औषधी मनाने घेण्यापेक्षा व्योषादी वटी घ्या.
वातावरण बदलामुळे,अॅलर्जी मुळे वरील लक्षणे निर्माण होत असल्यास उपयोग होतो
1)व्योषादी वटी कुठल्याही मेडीकल स्टोअर्स मध्ये मिळते.
2)ह्यात सुंठ, मिरे, पिंपळी, चित्रकमूळ, चव्य इत्यादी आयुर्वेदिक वनस्पती औषधी आहेत
3)भूक लागत नसेल तर भूक वाढवण्यासाठी सुद्धा ह्या वटी चा चांगला उपयोग होतो
4)तोंडाला चव नसेल, नाकातून दुर्गंधी युक्त दुर्गंधी येत असेल, डोके दुखत असेल, घट्ट चिक्कट कफ बाहेर पडत असेल अशावेळी ही वटी घ्यावी
5)ही वटी प्रौढ व बाल दोघांनाही देता येते
6) प्रौढांनी दिवसातून 5ते 6गोळया चघळाव्या किंवा गरम पाण्यात घ्यावे.
7)लहान मुलांना अर्धी गोळी 5ते 6वेळा चघळण्यास द्यावी
8)ही वटी अतिशय चवदार व सुगंधी असल्यामुळे लहान मुले आवडीने घेतात.
गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून
HPV - 16,HPV-18 ह्या नावाच्या व्हायरस ने गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. परंतु जरी त्या स्त्री मध्ये हे व्हायरस सापडले तरी कॅन्सर होईलच असे नाही. त्याच्या जोडीला अनेक कारणे आहेत त्यामुळे त्या अवयवांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली तरच कॅन्सर होतो.
- ह्या व्हारसपासून लगेच कॅन्सर होत नाही त्यामुळे कॅन्सर होण्यापासून रोखता येते.
-कॅन्सर होण्यासाठी जवळजवळ 20 वर्षांचा कालावधी लागतो.
*******गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची कारणे****
-HPV - 16,HPV - 18 हे मुख्य, त्यासोबत
-खुप वर्ष गर्भ निरोधक गोळया खाणे
-विवाहाच्या वेळी वय कमी असणे
-अधिक अपत्य असणे
-एकापेक्षा अधिक जोडीदार असणे
-धुम्रपान करणे
-अपत्यपथात वारंवार जंतूसंसर्ग होणे, मार्गाची अस्वच्छता
-रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे.
******************************************
गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे?
1)वरील सर्व कारणे टाळावी.
2)डाॅक्टर /वैद्य कडून PAP smear ही चाचणी करुन घ्यावी.
3)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ऋतु नुसार पंचकर्म, उत्तरबस्ति,अपत्यपथधुपन,धावन हे उपचार करावे . शक्तीवर्धक औषधी घ्याव्या.
4)आहार विधी, दिनचर्या, ऋतुचर्या पालन करावी.
5)शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवावे
Subscribe to:
Posts (Atom)
Premature graying of hair
केश पांढरे का होतात? त्यावर उपाय ********** Causes of graying of hair according to the ayurveda - शोकश्रमक्रोधकृत: शरीरोष्मा शिरोगत्त: l ...
-
बाळंतकाढा (प्रसूति झाल्यावर घ्यायचे अतिशय महत्त्वाचे आयुर्वेदिक औषध):- *बाळंतकाढा नंबर1: प्रसूति झाल्यावर प्रथम दिवसांपासून ते 10व्य...
-
*** INFERTILITY DUE TO TRAPPED EGG SYNDROME and IT’S AYURVEDIC TREATMENT****** - In normal menstrual cycle of 28-30days, usually ovu...
-
OBESITY: CAUSES OF OBESITY ACCORDING TO AYURVEDA 1) Excess intake of food 2) Eating food which is heavy to digest 3) Sweet food ...