शरिर व मानस शुद्धी झाल्यावर गर्भधारणेसाठी:-
1) पंचकर्म ,उत्तरकर्म-उत्तरबस्ति, योग,प्राणायाम,आसने ह्याद्वारे शुद्धी झाल्यावर एक महिन्यापर्यंत दोघांनीही ब्रम्हचर्यचे पालन करावे.
2) ब्रम्हचर्यचे पालन करतांना पुरुषांने अश्वगंधा,गोक्षुर इ. औषधाने मुख्यतः दुध, तूपाचा आहारात वापर करावा.
3) स्त्रियांच्या आहारात तिळ, तिळाचे तेल,उडिद ह्या खाद्य पदार्थांचा समावेश करावा.
4) तसेच स्री च्या आहारात देशी गाईचे दुध,ताजे दही,तुप,भाताची खीर असावी.
5) पुढे मासिक प्रवृत्ति झाल्यावर ,रक्तस्त्राव थांबल्यानंतर ऋतुकालात(गर्भधारणेसाठी योग्य काळ) गर्भधारणेसाठी प्रयत्न करावे.
6) त्यावेळीवातावरण,परिसर,घर,मन हे शांत,प्रसन्न,निर्मळक्लेशरहित असावे.
7) ह्यात गर्भधारणा झाली नाही तर पुन्हा एक महिन्यापर्यंत वरिल प्रमाणे आहार , ब्रम्हचर्यचे व्रत करुन गर्भधारणे च्या काळात प्रयत्न करावे.
9) ह्या काळात दोघांनीही एकमेकांशी मनोनुकुल वागावे.
10) स्त्री ला सौम्य संगित ऐकवावे.प्रिय-हितकर कथा सांगाव्या.
11) श्वेत वस्त्र व श्वेतपुष्प धारण करावी.
12) घरातील सर्व माणसे मनोनुकूल असावीत.
Ref-च.सं.शा.8,सु.सं.शा.2,अ.हृ.शा.1,अ.सं.शा.1,का.सं.शा.5
No comments:
Post a Comment