नस्यासाठी उत्तम काळ -प्रावृट
*नस्य- नस्यकर्म पंचकर्मापैकी एक कर्म आहे.नाकात औषध टाकले जाते म्हणून ह्याला नस्य कर्म असे म्हणतात.नस्य हे पंचकर्मातील अतिशय महत्त्वाची उपचार पद्धती आहे.
नस्यकर्माने निरनिराळ्या प्रकारची औषधी नाकाच्या मार्गाने शरिरात पोहचतात .
*प्रावृट् ऋतु- म्हणजे वर्षा आणि शरदाच्या मधला महिना ,म्हणजे वर्षाऋतुचा शेवटचा महिना. प्रावृट् ऋतूत पूर्ण महिनाभर नस्यकर्म करावे .
-नस्य कर्माने नाक,कान,डोळे,शिर,मान, खांदे,पाठ, केस इत्यादींचे स्वास्थ्य तसेच निद्रा ,मनस्वास्थ्य टिकण्यास खूपच उपयोग होतो.
---वारंवार सर्दी होणे,नाकाचे हाड वाकडे होणे,घोरणे,अर्धे डोके दुखणे,केस गळणे,केस पिकते, चेहऱ्यावरील वांग,मानेच्या शिरा ओढल्याप्रमाणे वाटणे,मान दुखणे,मानेच्या मणक्यांची झीज होणे,कानात आवाज येणे,झोप न येणे,खांदे अवघडणे-दुखणे,हातांना मुंग्या येणे अशा आजारात नस्यकर्माने गुण येतो.
***नस्यासाठी औषधी:-----
द्रवरुप- स्वरस, काढा,तेल, तूप
घनरुप-चूर्ण
वायुरुप- धूर /धुम
अशा ३स्वरुपातिल निरनिराळ्या प्रकारच्या औषधांचा उपयोग नस्यकर्मात केला जातो.
--ह्यासाठी साधारणतः अणुतैल,पंचेन्द्रियवर्धनतैल, नारायण तैल,नासार्शोहरतैल,बलातैल,कुंकुमादीतैल,
वचा,अपामार्ग,हरिद्रा, ओवा,त्रिकटु, इत्यादी औषधी उपयोगात आणली जातात.
******ह्यात रुग्णाला सर्वप्रथम चेहऱ्याला औषधी तैल लावून वाफेने किंवा पुरचुंडी ने शेक देतात.त्यानंतर मान खाली व छाती थोडी उंच असेल अशा पद्धतीने पाठ पुर्णपणे गादीला टेकेल असे उताणे झोपायला सांगतात..त्यानंतर नाकामध्ये औषधाची अखंड धार सोडतात.5-10 मिनिटांनी गरम पाण्याने गुळण्या करण्यास सांगितले जाते******
अशा पद्धतीने केल्यास नस्यकर्माचे वरिल फायदे मिळतात.
******नस्यकर्म तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली च करावे*******
No comments:
Post a Comment