कॅन्सर:- आयुर्वेदिक शास्त्रीय दृष्टिकोन
कॅन्सर म्हणजे काय?
1) शरिरात प्रत्येक क्षणाला नविन पेशी तयार होतात व जुन्या नष्ट होतात.ही क्रीया नियमितपणे होत असते.जेव्हा ही क्रीया बिघडून अनियमित पणे खुप प्रमाणात पेशी तयार होऊ लागतात तेव्हा त्याला कॅन्सर म्हणतात.
2) ह्या अनियमित पणे वाढलेल्या पेशी आजुबाजूच्या भागात पसरतात,तसेच रकत,रसाच्या माध्यमाने एका भागातून दुसऱ्या भागात जातात
******कॅन्सर कशामुळे होतो?
‘असे कोणतेही कारण ज्यामुळे शरिराची प्रतिकारशक्ती कमी होते त्या सर्व कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो.’
जसे शारिरीक आघात ,मानसीक आघात, केमिकल्स,व्यसने,औषधी,कृमी(व्हायरसेस) , प्रदुषितवातावरण,दुषित आहारीय पदार्थ, आनुवंशिकता इत्यादी.
***केवळ एकाच कारणामुळे कॅन्सर होत नाही .अनेक कारणांच्या परिणामस्वरूप कॅन्सर होतो.
**जर शरिराची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कॅन्सरची शक्यता कमी असते
प्रतिकारशक्ती म्हणजे---आपल्या शरिरात बाहेरचे पदार्थ आत आले तर आपल्या शरिरातील रक्षक सेना त्यांना आत येऊ देत नाही,त्याला बाहेर हाकलून लावते.त्या सेनेलाच प्रतिकारशक्ती म्हणतात.
****कॅन्सर होऊ नये म्हणून उपाय
-आयुर्वेदिक पद्धतीने दिनचर्या,ऋतुचर्या,आहारनियम पालन करावे
-रसायन सेवन करावे
-ऋतुनुसार पंचकर्म करावे
-मानसीक आरोग्यासाठी प्रयत्न करावे
-योग,आसने, प्राणायाम , सूर्यनमस्कार नियमाने करावे
• -जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.
***कॅन्सर झाल्यावर उपाय:-
1) आधुनिक शास्त्रानुसार सर्जरी, केमोथेरपी,रेडियेशन ही ट्रिटमेंट केली जाते. परंतु केमोथेरपी ने व्याधीयुक्त पेशी बरोबर चांगल्या निरोगी पेशी सुद्धा नष्ट होतात.ह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.बऱ्याचवेळा ह्या ट्रिटमेंट च्या साइड इफेक्टस् मुळे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते.
2) आयुर्वेदिक रसायनांने , पंचकर्माने रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.रसायन औषधी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात , त्यामुळे कॅन्सरसारखा दुर्धर आजाराशी आनंदाने लढता येते.याशिवाय औषधांचे दुष्परिणाम देखील होत नाही.
No comments:
Post a Comment