Thursday, 20 September 2018

शरिर व मानस शुद्धी झाल्यावर गर्भधारणेसाठी:-

शरिर व मानस शुद्धी झाल्यावर गर्भधारणेसाठी:-

1) पंचकर्म ,उत्तरकर्म-उत्तरबस्ति, योग,प्राणायाम,आसने ह्याद्वारे शुद्धी झाल्यावर एक महिन्यापर्यंत दोघांनीही ब्रम्हचर्यचे पालन करावे.
2) ब्रम्हचर्यचे पालन करतांना पुरुषांने अश्वगंधा,गोक्षुर इ. औषधाने मुख्यतः दुध, तूपाचा आहारात वापर करावा.
3) स्त्रियांच्या आहारात तिळ, तिळाचे तेल,उडिद ह्या खाद्य पदार्थांचा समावेश करावा.
4) तसेच स्री च्या आहारात देशी गाईचे दुध,ताजे दही,तुप,भाताची खीर असावी.
5) पुढे मासिक प्रवृत्ति झाल्यावर ,रक्तस्त्राव थांबल्यानंतर ऋतुकालात(गर्भधारणेसाठी योग्य काळ) गर्भधारणेसाठी प्रयत्न करावे.
6) त्यावेळीवातावरण,परिसर,घर,मन   हे  शांत,प्रसन्न,निर्मळक्लेशरहित असावे.
7) ह्यात गर्भधारणा झाली नाही तर पुन्हा एक महिन्यापर्यंत वरिल प्रमाणे आहार , ब्रम्हचर्यचे व्रत करुन गर्भधारणे च्या काळात प्रयत्न करावे.
9) ह्या काळात दोघांनीही एकमेकांशी  मनोनुकुल वागावे.
10) स्त्री ला सौम्य संगित ऐकवावे.प्रिय-हितकर कथा सांगाव्या.
11) श्वेत वस्त्र व श्वेतपुष्प धारण करावी.
12) घरातील सर्व माणसे मनोनुकूल असावीत.

Ref-च.सं.शा.8,सु.सं.शा.2,अ.हृ.शा.1,अ.सं.शा.1,का.सं.शा.5

आले पाक/आर्द्रक पाक

आले पाक/आर्द्रक पाक

**बहुगुणी व घरच्या घरी करता येण्यासारखा
सामुग्री-(संदर्भ-भा.भै.र.)

1) धुऊन साल काढून छोटे-छोटे तुकडे केलेले आले -500ग्रॅम
2) सेंद्रिय गुळ-500ग्रॅम
3)देशी गाईचे तूप-125ग्रॅम
4)सुंठ,जिरे,शहाजिरे ,मिरे, नागकेशर,विलायती, जायफळ, दालचिनी,तेजपान,धने,पिंपळी,पिंपळामूळ, वावडिंग,प्रत्येकी वस्त्रगाळ चुर्ण 6-6ग्रॅम 

कृती-
1)आल्याचे तुकडे तुपात लाल होईपर्यंत भाजून घ्यावे.
2) गुळाचा कडक पाक तयार करावा.त्यात भाजलेले आल्याचे तुकडे टाकावेत व वरील सर्व औषधी चुर्ण मिसळाव्या.
3)मिश्रण थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

औषधी उपयोग:-
1)वात व कफाचे आजारात अतिशय उपयोगी आहे
2) गर्भिणी अवस्थेत मळमळ,उलटयांचा त्रास होत असल्यास ह्या औषधाने कमी होतो
3)सर्दि,खोकला,घसा दुखणे,घसा बसणे ,दमा,श्वासनलिकेचे आजारात खूप गुणकारी आहे
4) भूक न लागणे,तोंडाला चव नसणे,पोटदुखी,पोट साफ न होणे, पोटात वात धरणे ,खाल्ले की लगेच शौचास जावे लागणे अशा तक्रारी वर हे औषध चांगले काम करते
5)सर्व अंगावर सूज येणे,अंग दुखणे ह्यात ह्या औषधाने चांगला गुण येतो.

गर्भधारणेसाठी आयुर्वेद

गर्भधारणेसाठी आयुर्वेद

 
आयुर्वेदिक पद्धतीने गर्भधारणा केल्यास मनोवांछीत व उत्तम गुणांनी युक्त अपत्यप्राप्ती होते.
जसे
1) उत्तम प्रतिकारशक्तीयुक्त
2) चिरायु
3) सत्यवान
4) आज्ञाकारी
5) कर्तव्यपरायण
6) धार्मिक
7) महाबुद्धिमान
8) महागुणवान
9) सर्व अवयवयुक्त
10) सत्गुणी

Ref अ.सं.शा.1/70-71,सु.सं.शा.2/34,सु.सं.शा.3/35

गर्भधारणेसाठी

आयुर्वेद शास्त्रानुसार गर्भधारणेसाठी आवश्यक 4 घटक-

1) ऋतु- गर्भधारणेसाठी योग्य काळ ,मासिक पाळी झाल्यानंतर-7-10दिवसांपर्यंत-(period of ovulation)
2) क्षेत्र- गर्भाशय व त्याच्याशी संबंधित अवयव( female reproductive system)
3) अम्बु- रसरक्तादी पोषक तत्त्व (Nourishing substance)
4) बीज-स्त्रीबीज( ovum) व पुरुष बीज(Sperm)

हे चारही घटक निरोगी असतील तर अवश्य गर्भ प्राप्ती होते.

परंतु आयुर्वेदिक शास्त्रीय दृष्टिकोनातून केवळ गर्भप्राप्ती महत्त्वाची नाही,

तर सुप्रजा, निरोगी प्रजा, शारिरीक ,मानसिक स्वास्थ युक्त निरोगी अपत्यप्राप्ती हे गर्भधारणेचे प्रयोजन आहे.

***आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार गर्भधारणेसाठी स्त्री व पुरुषाने प्रथम शारिरीक व मानसिक स्तरावर पंचकर्म ,योग, प्राणायामाने शुद्धी करुन घ्यावी.त्यांच्या सल्ल्यानुसार औषधी घ्यावी.******

नस्य

नस्यासाठी उत्तम काळ -प्रावृट

*नस्य- नस्यकर्म  पंचकर्मापैकी  एक कर्म आहे.नाकात औषध टाकले  जाते म्हणून ह्याला  नस्य कर्म असे म्हणतात.नस्य हे पंचकर्मातील अतिशय महत्त्वाची उपचार पद्धती आहे.

नस्यकर्माने निरनिराळ्या प्रकारची औषधी नाकाच्या मार्गाने शरिरात पोहचतात .

*प्रावृट् ऋतु- म्हणजे वर्षा आणि शरदाच्या मधला  महिना  ,म्हणजे वर्षाऋतुचा शेवटचा महिना. प्रावृट् ऋतूत पूर्ण महिनाभर नस्यकर्म करावे .

-नस्य कर्माने नाक,कान,डोळे,शिर,मान, खांदे,पाठ, केस इत्यादींचे स्वास्थ्य तसेच निद्रा ,मनस्वास्थ्य टिकण्यास खूपच उपयोग होतो.
---वारंवार सर्दी होणे,नाकाचे हाड वाकडे होणे,घोरणे,अर्धे डोके दुखणे,केस गळणे,केस पिकते, चेहऱ्यावरील वांग,मानेच्या शिरा ओढल्याप्रमाणे वाटणे,मान दुखणे,मानेच्या मणक्यांची झीज होणे,कानात आवाज येणे,झोप न येणे,खांदे अवघडणे-दुखणे,हातांना मुंग्या येणे अशा आजारात नस्यकर्माने गुण येतो.

***नस्यासाठी औषधी:-----
द्रवरुप- स्वरस, काढा,तेल, तूप 
घनरुप-चूर्ण
वायुरुप- धूर  /धुम
अशा ३स्वरुपातिल निरनिराळ्या प्रकारच्या औषधांचा उपयोग नस्यकर्मात  केला जातो.
--ह्यासाठी साधारणतः अणुतैल,पंचेन्द्रियवर्धनतैल, नारायण तैल,नासार्शोहरतैल,बलातैल,कुंकुमादीतैल,
वचा,अपामार्ग,हरिद्रा, ओवा,त्रिकटु, इत्यादी औषधी  उपयोगात आणली जातात.

******ह्यात रुग्णाला सर्वप्रथम चेहऱ्याला औषधी तैल लावून वाफेने किंवा पुरचुंडी ने शेक देतात.त्यानंतर मान खाली व छाती थोडी उंच असेल अशा पद्धतीने पाठ पुर्णपणे गादीला टेकेल असे उताणे झोपायला सांगतात..त्यानंतर नाकामध्ये औषधाची अखंड धार सोडतात.5-10 मिनिटांनी गरम पाण्याने गुळण्या करण्यास सांगितले जाते******

अशा पद्धतीने केल्यास नस्यकर्माचे वरिल फायदे मिळतात.

******नस्यकर्म तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली च करावे*******

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...