“पाळीत तणाव टाळा ”
1)आयुर्वेद हे जीवनाचे प्रत्यक्षशास्त्र आहे.
2) ह्यात स्त्रियांचे पोषण, वयानुसार होणारे बदल, मासिक पाळी त पाळायचे नियम, नियम न पाळल्यास होणारे आजार, त्यामुळे अपत्यप्राप्ती मध्ये निर्माण होणारे अडथळे,अपत्यात येणारे आजार, गर्भारपणात घ्यायची औषधी,आहार, प्रसूति,प्रसूतिमध्ये येणारे अडथळे, प्रसूति झाल्यावर होणारे आजार, बाळांनाहोणारे आजार, उपचार इत्यादींचे सविस्तर माहिती आहे .
3)ज्याप्रमाणे झाडाला चांगले खतपाणी घातले,पोषक वातावरण मिळाले की चांगले पिक येते,मधुर चविष्ट फळे येतात, त्याचप्रमाणे स्त्रियांना योग्य पौष्टिक आहार, वातावरण मिळाले तर चांगली पिढी तयार होते
4)आयुर्वेदात“अपत्यानां मूलं नार्य:------”म्हणजे अपत्या(बाळ) चे मूळ स्त्री/नारी आहे असे ठासून सांगितले आहे
5)सद्ध्या PCOS/PCOD प्रमाण फार वाढले आहे
“PCOS/PCOD म्हणजे शरीरात/बीजग्रंथी मध्ये बीज आहेत परंतु शरीरातील वातावरण बिघडल्याने नैसर्गिक पणे बीज बाहेर पडण्याची क्रिया थांबते.”
6)PCOD असलेल्या काही स्त्रिया/मुली जाड तर काही बारीक असतात.काही कॉलेज मध्ये जाणाऱ्या तर काही नोकरी करणाऱ्या तर काही घरात कामं करणाऱ्या तर काही गृहिणी आहेत
7) काहींना प्रचंड ताण आहे तर काही फार रिलॅक्स आहेत.
8)काही जणी नियमित व्यायाम करतात, आहार घेतात तर काही जणी ह्याबाबतीत अगदीच बेशिस्त असतात.
9)काहींना चयापचयाच्या तक्रारी आहेत,तर काहींना मलबद्धता आहे,तर काहींना मुत्राच्या तक्रारी आहेत.
10)आधुनिक शास्त्रानुसार PCOD/PCOS ची ट्रिटमेंट सर्व स्त्रीयांसाठी सारखीच आहे.
11)आयुर्वेदात रुग्णाचे सखोलपणे परिक्षण करुन वात,पित्त,कफ यावर आधारित पंचकर्मातील आवश्यक ते कर्म , औषधींची निवड करण्यात येते.
12)सद्ध्या स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी फार वाढल्या आहेत.अंगावर लाल,पांढरे जाणे,गर्भाशयात गाठी होणे,गर्भ न राहणे, पाळीच्या आधी कंबर पाठ दुखणे, डोकं दुखणे , पाळी जातांना बी.पी.,शुगर असे आजार वाढलेले आहेत.
13)ह्या युगातील स्त्रिया ऑफिस सांभाळून घरीदेखील तेवढ्याच तत्परतेने सांभाळतात.हे करतांना शारीरिक ,मानसिक ताण घालवण्यासाठी काहीही उपाय करत नाहीत.
14)पाळीच्यावेळी ताण अधिकच वाढतो.ह्याचा परिणाम तसेच आहारविहाराच्या बदल़ेल्या सवयी ह्यामुळे गर्भाशयाच्या तक्रारी वाढल्या आहेत.
15)आयुर्वेद मते पाळीच्या वेळी शारीरिक व मानसिक विश्रांती,सहज पचेल असा आहार ह्याला विशेष महत्त्व दिले आहे.
16)नियमाने वागल्यास पाळीच्या समस्या निर्माण होत नाहीत तसेच पुढे निरोगी अपत्यप्राप्ती होते.
No comments:
Post a Comment