Wednesday, 9 May 2018

Masik Pali

**मासिक पाळी 
जातांना होणारा त्रास टाळण्यासाठी:-

मासिक पाळी जातांना  स्त्रियांमध्ये    निरनिराळ्या  तक्रारी निर्माण होतात जसे
1)चीडचीड होणे
2)मन एकाग्र न होणे
3)विसरभोळेपणा 
4)अचानक अंगातून वाफा येणे
5) विनाकारण शरीर गरम होणे
6) दरदरून घाम सुटणे
7)थकवा वाटते
8)सांधे ,कंबर,पाठ दुखणे
9) वारंवार लघवीला होणे,शिकले, खोकलले की अचानक लघवीला होणे
10)वजन वाढणे
11)स्वभावात लहरीपणा येणे
12) झोप न लागणे
13) पाळी अनियमित होणे
14)  स्तनांमध्ये जडपणा जाणवणे
15 ) त्वचा कोरडी पडणे, खाज येणे

***आयुर्वेद शास्त्रानुसार ह्या वयात वात अधिक वाढतो व पित्ताचे असंतुलन होते त्यामुळे ही लक्षणे निर्माण होतात
****आधुनिक शास्त्रानुसार शरिरातील इस्ट्रोजन ,प्रोजेस्टेरोन हे हार्मोन कमी झाल्याने ही लक्षणे निर्माण होतात. वरील लक्षणे निर्माण झाल्यास स्त्रियांना कृत्रिम हार्मोन्स देतात.
****आयुर्वेदात वात कमी करण्यासाठी व पित्ताचे संतुलन ठेवणारी औषधे वाजीकरण,रसायन  औषधी, पंचकर्म उपचार,आसन, प्राणायाम यांचा उपयोग करतात .
हे उपाय शरीरात साइड इफेक्ट निर्माण करत नाहीत,तसेच प्रतिकारशक्ती वाढवतात.

**उपचार:-
1) शिरोधारा :- औषधीयुक्त-दुध /तेल
2) शिरोपिचू/शिरोभ्यंग
3) नेत्रतर्पण
4) नस्य
5) बस्ति-काढा/तेल/औषधीयुक्त दुध
6) नाभी पुरण
7) मसाज,शेक
8) विरेचन
9) योनीपुरण इत्यादी 

-औषधे
आवळा,हिरडा, शंखपुष्पी,विदारिकंद, दशमूल, शतावरी,ब्राम्ही, गुग्गुळ,गुडुची वेखंड,प्रवाळ,मौक्तिक, औषधी युक्तदुधतुप,च्यवनप्राश,अवलेह,ताप्यादीलोह,मेध्यरसायन, इत्यादींचा
आवश्यकतेनुसार वापर केला जातो.
****आयुर्वेद तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावे *******

No comments:

Post a Comment

Premature graying of hair

  केश पांढरे का होतात? त्यावर उपाय  ********** Causes of graying of hair according to the ayurveda - शोकश्रमक्रोधकृत: शरीरोष्मा शिरोगत्त: l ...