Sunday, 5 May 2019

कांदा/पलांडु /प्याज

आयुर्वेदिक औषधी गुणधर्म -

1) तिखट व गोडसर चवीचे असतो
2) स्निग्ध  असून अनुष्ण व थंड गुणाचे आहे 
3) अनुष्ण असल्यामुळे अधिक पित्त वाढवत नाही
4) स्निग्ध व गोड असल्यामुळे कफ वाढवतो व वात कमी करतो
5) मुळव्याधीत पोट साफ होत नसल्यास 1/2 कांदा पाव वाटी दह्यातून खावा. ह्याने वायु,मूत्र,शौचा ची योग्य प्रवृत्ती होते. 
6) अजीर्ण तसेच भूक लागत नसेल तर 10 मिली कांद्याच्या रसात    2मिली आल्याचा रस मिसळून जेवतांना घ्यावा. 
7) अतिसार,द्रवमलप्रवृत्ति,डायरीया. झाल्यास कांद्याच्या रसात ओवा, कापूर घालून प्यावे
8) चक्कर,ग्लानी आल्यास कांद्याचा रसाचे थेंब नाकात सोडावे
9) वीर्य शक्तीसाठी कांद्याचा रस 10 मिली प्रमाणात साखर व तूपातून घ्यावा

संदर्भ ः गो. आ. फडके

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...