1) ह्या तेलाचा उपयोग लहान बाळ ते वृद्ध अश्या सर्व वयोगटासाठी तसेच स्री व पुरुष दोघांसाठीही होतो.
2) स्त्रियांमध्ये पाळी च्या तक्रारी; जसे पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे, पाळी आल्यावर 15-15दिवस रक्तस्राव होणे,पाळीच्या वेळी गळून जाणे,डोके ,पोट,पाठ दुखणे, मळमळणे ह्यामध्ये उपयोग होतो.
3) ह्या तेलाने मालिश केल्यास हाडे मजबूत होतात.
4) लहान मुलांमध्ये वजन वाढवण्यासाठी ह्या औषधाचा आवर्जून उपयोग करावा
5) Rickets मध्ये विशेषतः वापर केला जातो.मालिशबरोबरच पोटातून लोहभस्म/मोती पिष्टी/सुवर्ण मालिनी वसंत/प्रवाळ पिष्टी इत्यादी औषधाने चांगला फायदा होतो.
6) डोळ्यांची आग होणे, डोके दुखणे, ह्या तक्रारींसाठी प्रत्येक नाकपुडीत 4-4थेंब तेल टाकल्यास तक्रारी दुर होतात.
7) शरीरावर पुळ्या आलेल्या असल्यास,आग होत असल्यास,खाज येत असल्यास हे तेल हलक्या हाताने लावावे.लगेच आग,खाज कमी होते.
8) संधीवात, सांधेदुखी,सांधे सुजणे, शरीरातील कॅल्शिअम चे प्रमाण कमी होणे ,रक्ताची कमतरता, वारंवार ताप येणे ह्या आजारात ह्यातेलाने बस्ती व मालिश केल्याने बऱ्याच तक्रारी कमी होतात.
9) श्र्वास,दमा ,जुना खोकला असणाऱ्यांनी रोज दिवसातून 2वेळा जेवणानंतर 10मिली एवढे हे औषधी तेल प्यावे व वरुन कोमट पाणी प्यावे.
10) दिर्घ आजारातून उठल्यावर अशक्तपणा आल्यास ह्या तेलाने मालीश केल्याने ताकद येते.
****औषध वैद्याच्या सल्ल्याने घेणे अधिक चांगले********
No comments:
Post a Comment